यवतमाळ सामाजिक

मुस्लिम सेवा संघाच्या जिल्हा अध्यक्षपदी जावेद अली काझी यांची निवड

———————————————–
यवतमाळ-: तालुक्यातील रूई (वाई) येथिल रहिवासी सतत सामाजिक कार्यात तत्पर राहून सामाजिक कार्य करत राहणारे शैक्षणिक व आरोग्य, सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रात सक्रिय सहभाग घेणारे युवा नेतृत्व जावेद अली ईमदाद अली काझी यांची मुस्लिम सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष जनाब फिरोज महसुलदार साहेब यांच्या सूचनेवरून प्रदेशाध्यक्ष शरीफ देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनात विदर्भ मो. एजाज साहेब यांनी जिल्हाध्यक्ष म्हणून निवड केली आहे.
जावेद अली ईमदाद अली काझी हे सामाजिक कार्यात कार्यतत्पर असल्याचे परिचित आहे. याचीच दखल घेत मुस्लिम सेवा संघाने मुस्लिम सेवा संघाचे प्रसार व्हावा प्रत्येक समाज बांधवाने यात सहभागी होवून भरीव कार्य करावे यासाठी ही निवड केल्या गेली आहे. ही निवड करून जो विश्वास आपणावर दाखविला या विश्वासाला आपण कधीच तडा जाऊ न देता समाजाचे आपण काही देणे लागतो ही भावना मनात ठेवून मुस्लिम सेवा संघाच्या माध्यमातून कार्यरत राहू असे नवनिर्वाचित निवड झालेले जिल्हाअध्यक्ष जावेद अली यांनी आपले मनोदय व्यक्त करून आपल्या निवडीचे श्रेय राष्ट्रीय अध्यक्ष जनाब फिरोज महसुलदार साहेब, प्रदेशाध्यक्ष शरीफ देशमुख साहेब आणि विदर्भ अध्यक्ष मो. एजाज साहेब यांना देत आहे. या निवडीने त्यांच्यावर यवतमाळ जिल्ह्यातील समाज बाधवाकडून शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे. सोबतच त्यांच्या नियुक्ती ने व त्यांच्या कार्याबद्दल रुई (वाई) परिसरात कौतुक केल्या जात आहे.

Copyright ©