यवतमाळ सामाजिक

क्रांतीवीर बिरसा मुंडा सांस्कृतिक भवनाच्या उद्घाटन व लोकार्पण सोहळा

(सामाजिक कार्यकर्ते लोकेश इंगोले यांच्या संकल्पनेतून कोरोनामध्ये मुत्यझालेल्या साठी मोफत बिछायत,खुर्च्या,ॲक्वा,मॅट लोकार्पण सोहळा )

( दर्शनाताई इंगोले यांच्या संकल्पनेतून कोरोना काळात जीवाची पर्वा न करणारे कर्मचारी,अंगनवाडी सेविका,आशा वर्कर्स यांचा सत्कार सोहळा
तसेच परिसरात
वृक्षारोपण कार्यक्रम)

यवतमाळ – २७ जुन
आदिवासी समाज बहुउद्देशीय संस्था उमरसरा (नविन) यांच्या वतीने क्रांतीवीर बिरसा मुंडा सांस्कृतिक भवनाचा उद्घाटन व लोकार्पण सोहळा कार्यक्रम २७ जुन ला ग्रामपंचायत उमरसरा नविन येथे मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला.
यावेळी अध्यक्षस्थानी वसंतराव पुरके,माजी शिक्षणमंत्री तथा उपाध्यक्ष आदिवासी विकास महामंडळ, नाशिक हे होते. तर उद्घाटक बाळासाहेब मांगुळकर माजी जि.प.उपाध्यक्ष होते तर प्रमुख अतिथी म्हणून कांचनताई चौधरी,नगराध्यक्ष चंदुभाऊ चौधरी नगरसेवक, दर्शनाताई इंगोले, भारती इंगोले माजी जि.प.सदस्य ,सुरेश कन्नाके केंद्रीय कार्यध्यक्ष,ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन,उपाध्यक्ष ऑ.इ.आ.ए.फे.म.रा. गुलाबराव कुडमेथ,राजु चांदेकर, अध्यक्ष उलगुलान संघटना, दिलीप सेडमाके जिल्हाध्यक्ष गो.ग.पक्ष, पवनकुमार आत्राम, डॉ.हरिश धुर्व, निनाद सुरपाम,बाळु वट्टी होते.

सर्वप्रथम बिरसामुंडा यांच्या फोटो चे पुजन करण्यात आले.मान्यवरांचे हस्ते भवनाचा व निःशुल्क कोरोना मृत्यू झालेल्या कुटुंबासाठी बिछायत,खुर्ची,ॲक्वा,मॅट चे लोकार्पण फित कापुन करण्यात आले.

प्रास्ताविक नगरसेविका प्रभाग २२ दर्शनाताई लोकेश इंगोले यांनी केले.
त्यांनी आपल्या प्रास्ताविकातुन २२ प्रभागांमध्ये आपल्या हातुन आदिवासी समाजासाठी क्रांतीवीर बिरसा भवन झाल्याचा योग आल्याचा आनंद झाला असे सांगितले.

यावेळी कोरोना काळात कोरोना योध्दा म्हणुण काम करणारे कर्मचारी, अंगनवाडी सेविका व आशा वर्कर्स,कोया पुनेम गोटुल समिती यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी आदिवासी समाज बहुउद्देशीय संस्था च्या वतीने दिलीप उईके यांनी आदिवासी समाज भवन मोकळ्या परिसरात बांधण्यासंदर्भात निवेदन मान्यवरांना दिले.

आदिवासी समाजाच्या वतीने क्रांतीवीर बिरसा मुंडा बहुउद्देशीय मंडळ, आर्णी नाका यांच्या वतीने दर्शनाताई लोकेश इंगोले यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर उईके सर यांनी केले तर आभार प्रदर्शन गजानन कोटनाके यांनी केले.
यावेळी सर्व आदिवासी संघटनेचे पदाधिकारी तथा परिसरातील बांधवाची उपस्थिती होती.

Copyright ©