यवतमाळ सामाजिक

राळेगाव येथे शांतता कमिटीची सभा संपन्न व्यसनमुक्ती वर जनजागृती कार्यक्रम

राळेगाव स्थानिक पोलिस स्टेशन येथे २६ जून आतंरराष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी दिनाचे औचित्य साधून दिनांक २७ रोजी शांतता कमिटीची सभा घेण्यात आली सोबतच व्यसनमुक्ती वर प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी तालुक्यातील पोलीस पाटील संघटना महिला दक्षता समिती पत्रकार सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते कोविड काळातील शासन निर्देशाचे पालन करावे अशा सूचना याप्रसंगी देण्यात आल्या तसेच संकल्प व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र यवतमाळ तसेच नशाबंदी मंडळ द्वारा व्यसनमुक्ती वर आधारित पथनाट्य सादर करण्यात आले यावेळी संस्थेचे प्रकल्प निर्देशक प्रवीण टिप्रमवार यांनी व्यसनाधिनता ही समस्या नसून हा आजार आहे, समस्येवर समाधान असते, मात्र आजार हा उपचाराशिवाय बरा होत नाही आणि अधिन व्यक्ती मार धाक वा अतिप्रेम केल्यानेही तो सुधरतो असे नाही तर त्याला उपचाराची गरज असते असे मत आपल्या कलापथकाच्या माध्यमातून व्यक्त केले. पुढे बोलतांना प्रवीण टीप्रमवार यांनी व्यसनामुळे होणारे दुष्परिणाम या आधारावर पथनाट्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली कार्यक्रमात ऍड रोशनी वानोडे यांनी व्यसनमुक्ती वर आपले विचार व्यक्त केले यावेळी ठाणेदार प्रकाश तुनकलवार , पोलीस पाटील, नारी शक्ती संघटना च्या महिला उपस्थित होत्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ऍड. रोशनी वानोडे यांनी केले.
यावेळी दक्षता समितीच्या सदस्या पंचफुला चाफले व तालुक्यातील सेवाभावी डॉक्टर बाबाराव भोयर यांना श्रद्धांजली वाहिण्यात आली .

Copyright ©