यवतमाळ सामाजिक

हिवरी पाणी पुरवठा विद्युत पंपास सौरऊर्जेद्वारे वीज पुरवठा

हिवरी- ग्रामपंचायतचे वीज बिल थकले की, महावितरण कंपनीकडून वीज पुरवठा खंडित केला जातो.व त्याचा फटका सार्वजनिक पाणी पुरवठयास व पर्यायाने ग्रामस्थांना बसतो असे चित्र सर्वत्र पहावयास मिळते. यावर उपाय म्हणून यवतमाळ तालुक्यातील हिवरी ग्रामपंचायतीने गावास पाणी पुरवठा करणाऱ्या विद्युत पंपास सौरऊर्जेद्वारे वीज पुरवठा सुरू केला जाणार आहे. सौर ऊर्जेच्या माध्यमातून वीज पुरवठा सुरू झाल्यामुळे अतिरिक्त वीजबिलाबरोबर खंडित वीज पुरवठा त्रासातूनही ग्रामस्थांची सुटका झाली आहे. हिवरी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पाणी पुरवठा सौर ऊर्जेच्या माध्यमातून वीज पुरवठा योजनेचा नुकताच शुभारंभ करण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा नियोजन समिती कार्यक्रमाअंतर्गत पाणी पुरवठा योजनेस सौर पंप देण्याची योजना सुरू करण्यात आली होती. हिवरी ग्रामपंचायतीच्या वतीने सदर योजनेसाठी प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. ग्रामपंचायतीच्या प्रस्तावास मंजुरी मिळुन सिग्मा एनर्जी रिसोर्सेस प्रा.लि.पुणे या कंपनीच्या वतीने हिवरी येथील पाणी पुरवठा विहीरीवर सौर ऊर्जेच्या माध्यमातून विद्युत पंपास वीज पुरवठा करणारी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. योजनेअंतर्गत ७ अश्वशक्तीचा विद्युत पंप कार्यान्वित करण्यात आला.असुन त्यामाध्यमातून गावास पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. नुकताच या कामाचा शुभारंभ सरपंच सौ.रंजना भगत, उपसरपंच अभिजीत मुरखे, ग्रा.पं.सदस्य अनंता राऊत,संध्या अतकारी , सुषमा राऊत, ममता खोडकुंभे, विनीता चेके पाणी पुरवठा कर्मचारी रंजीत महेर, विनोद ठाकरे व ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आला. याबाबत हिवरी गावचे उपसरपंच अभिजीत मुरखे म्हणाले.ग्रामपंचायतीस येणाऱ्या वीजबीलामुळे ग्रामपंचायतीवर मोठा आर्थिक ताण येत होता.सौर उर्जेवर सार्वजनिक पाणी पुरवठयास विद्युत पंप सुरू केल्यामुळे ग्रामपंचायतीची अतिरिक्त विज बिलातून सुटका होईल व ग्रामस्थांना नियमित पाणी पुरवठा होईल.

Copyright ©