यवतमाळ सामाजिक

दूध उत्पादक व विक्रेता गवळी समाज संघटनेनी केली दुधाची भाव वाढ

महाराष्ट्र राज्य दूध उत्पादक व विक्रेता गवळी समाज संघटनेनी केली दुधाची भाव वाढ करण्यात आली आहे सर्वत्र महागाई ने कळस गाठला तेला पासुन तर जीवनावश्यक तर चैनीच्या वस्तु पर्यंत भाव वाढ झाली ढेपीचे भाव दुप्पट झाले जनावरांना चारा मिळणे दुरापास्त झाल्याने अनेक व्यावसायिकांकडे थोडे फार जनावरे आहे आणि त्यावरच परिवाराचा उदरनिर्वाह सुरू आहे याच भाव वाडीला अनुसरून दुधाची भाव वाढ करण्यात आलेली आहे उत्पादकांना ५० रुपयांनी डेरिधारक देईल आणि ग्राहकांना ५५ रुपये प्रमाणे विक्री करण्यात येणार असल्याचे नुकत्याच झालेल्या सभेत मान्यता देण्यात आली या वेळी संघटनेचे रामेश्वर यादव प्रकाश लंगोटे ,ओंकार चेके, गजानन डोळे प्रभाकर डोळे,प्रकाश अवथळे विनोद चेके, दिपक कालोकार,संजय डोळे व अनेक दुध उत्पादक विक्रेते उपस्थित होते.

Copyright ©