यवतमाळ राजकीय

माजी मंत्री संजय राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त घाटंजीत विविध कार्यक्रमांचे आयोजन

——————————————–
आर्णी विधानसभा युवा सेनेचा पुढाकार 
——————————————–
घाटंजी- लोकनेते कार्यसम्राट अशी ख्याती असलेले माजी मंत्री आमदार संजय राठोड यांचा वाढदिवस येत्या ३० जून ला येत आहे. त्यानिमित्ताने आर्णी विधानसभा युवा सेनेच्या वतीने घाटंजीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सर्वांच्या सुख दुःखात सहभागी होणारे प्रत्येक कार्यकर्त्यांशी जवळीक साधून अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील असणारे लोकनेते कार्यसम्राट माजी मंत्री आमदार संजय राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त घाटंजी मध्ये दिनांक २९ जून ला विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व प्रथम घाटंजी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करण्यात येवून तहसिल कार्यालय, पंचायत समिती व पोलीस स्टेशन ला सेनिटायझर मशीन भेट देण्यात येणार आहे. सोबतच पोलीस स्टेशन चौकातील भाजीपाला विक्रेत्यांना छत्री चे वाटप करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम दिनांक २९ जून मंगळवार ला ठीक १२ वाजता आयोजित असून याचा लाभ गरजवंतानी घ्यावा असे आवाहन युवासेना उपजिल्हाप्रमुख आर्णी विधानसभेचे आकाश राठोड यांनी केले आहे. हा उपक्रम शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विश्वास नांदेकर, पराग पिंगळे, प्रविण शिंदे, गजानन बेंजकिवार, विक्रांत चचडा, रुपेश कल्यमवार, निलेश चव्हाण, मनोज ढगले, यांच्या मार्गदर्शनात आयोजित करण्यात आले आहे. ह्या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक युवासेना उपजिल्हाप्रमुख आर्णी विधानसभेचे आकाश राठोड हे असून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी घाटंजी तालुका शिवसैनिकांचे सहकार्य लाभत असल्याचे आकाश राठोड यांनी कळविले आहे.

Copyright ©