यवतमाळ सामाजिक

राष्ट्रीय बंजारा टायगर्स ची मुंबई येथे 29 जून ला बैठकीचे आयोजन

———————————————-
काँग्रेस पक्षासोबत संलग्न होणे संदर्भात चर्चेसाठी बैठकीचे आयोजन.
———————————————

यवतमाळ: राष्ट्रीय बंजारा टायगर्स ही देशातील सर्वात मोठी बंजारा संघटना असून या संघटनेचे अनेक समाजपयोगी कार्यात खूप मोठे योगदान राहिलेले आहे. मात्र बंजारा समाजाची राजकीय अवस्था फारच बिकट असल्याने व समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाजाच्या कार्यकर्त्यांनी राजकारणात येणे गरजेचे असल्याने भविष्यात राज्यात व देशात बंजारा समाजाचे अस्तित्व दाखवून देण्यासाठी राजकारणात येणे गरजेचे आहे. त्यामुळे माजी मुख्यमंत्री महानायक वसंतरावजी नाईक व सुधाकररावजी नाईक साहेबांनी वाढविलेल्या काँग्रेस पक्षासोबत काम करण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी *राष्ट्रीय बंजारा टायगर्सच्या पदाधिकाऱयांची बैठक दि. 29 जून 2021 रोजी दुपारी 12 वा. काँग्रेस कार्यालय , टिळक भवन, काकासाहेब गाडगीळ मार्ग , दादर मुंबई 400025*
येथे आयोजित करण्यात आलेली आहे. या बैठकीस *राष्ट्रीय अध्यक्ष आत्मारामजी जाधव , राष्ट्रीय कार्याध्यक्ष मदनभाऊ जाधव , राष्ट्रीय उपाध्यक्ष अमृत मेढकर, राष्ट्रीय उपाध्यक्ष वीरेंद्र रत्ने,राष्ट्रीय महासचिव वाल्मिक पवार, राष्ट्रीय सरचिटणीस अनिल पवार, राष्ट्रीय कोषाध्यक्ष राजेश नाईक , राष्ट्रीय प्रवक्ता ऍड अविनाश जाधव , राष्ट्रीय सचिव प्रभू चव्हाण , राजू चव्हाण* आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत तसेच या बैठकीस खास मार्गदर्शन करण्यासाठी व *बंजारा टायगर्सच्या नेत्यांशी चर्चा करण्यासाठी काँग्रेस पक्ष्याचे प्रदेशाध्यक्ष मा नाना पटोले उपस्थित राहणार आहेत तसेच त्यांच्या सोबत उपाध्यक्ष संजय राठोड , व इतर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत* .तरी सर्व राज्य कार्यकारणी पदाधिकारी , जिल्हा अध्यक्ष व जिल्हाकार्यकारणी पदाधिकारी , तालुका अध्यक्ष व तालुका कार्यकारणी पदाधिकारी तसेच कार्यकर्ते व समर्थकांनी मोठ्या संख्येने या बैठकीस उपस्थित राहून हा कार्यक्रम यशस्वी करावा असे आवाहन राष्ट्रीय बंजारा टायगर्स चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गजानन जाधव यांनी केले आहे.

Copyright ©