यवतमाळ सामाजिक

यवतमाळ तालुका भाजपा तर्फे हिवरी येथे महामार्गावर चक्काजाम आंदोलन

——————————————-
ओबिसीचे राजकिय आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केल्यावरून आंदोलन
——————————————-
यवतमाळ- राजकिय आरक्षण रद्द होण्याचा फटका ओबीसी, एन. टी., व्ही. जे. या समूहाला बसणार आहेत. हे सर्व नामाप्र मध्ये समाविष्ट आहेत. महाराष्ट्रामध्ये २७ महानगरपालिका,३४ जिल्हा परिषद,३६४ पंचायत समिती,२८ हजार ग्राम पंचायतिचा समावेश असून स्थानिक स्वराज्य संस्थेतून ५६ हजार ओबीसी प्रतिनिधी निवडून जात असतात. यात सर्वोच्च न्यायालयाने घेतलेल्या निर्णयामुळे चांगलाच फटका बसला आहे. देशात ही संख्या ९ लाखाच्या घरात आहे. भटके, विमुक्त व ईतर मागासवर्गीय यांचा राजसत्तेतील सहभाग या निर्णयाने थांबणार आहे. त्यामुळे याविरोधात यवतमाळ तालुका भारतीय जनता पक्षाचे वतीने नागपूर -तुळजापूर महामार्गावर हिवरी येथे भाजपाचे नेते मदन येरावार यांच्या मार्गदर्शनात तालुका अध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती माजी जी. प. उपाध्यक्ष श्यामभाऊ जयस्वाल, जिल्हा सरचिटणीस राजुभाऊ पडगीलवार, विधानसभा प्रमुख बाळासाहेब शिंदे, जी. प. सदस्या रेनुताई शिंदे पाटील, प. स. सदस्या सूनिताताई मडावी, संजय शिंदे पाटील, मनोज म्याडमवार, दिलीप पुरी, थावरू चव्हाण, राजु झामरे, सुखदेव जाधव, हिवरी ग्राम पंचायतीच्या सरपंचा रंजनाताई भगत, मुक्ताताई दांडेकर, वसंतदादा जाधव, मनोहर चंदनखेडे, संतोष काळे, दिनेश पवार, राहुल पारधी, सचिन भेंडेकर, राजु नरोडे, विजय सहारे, अजय धुरट, शुभम गुप्ता, धिरज शेरकर, किशोर लभमे, अविनाश चिंचोलकर, वसीम शेख, अंभोरे, अमोल डफाळ, तुकाराम शहारे, सुभाष मडावी, पंकज भाऊ, विजय तेलंगे, प्रशांत लीहितकर, अजय सहारे, बबन चेके, शंकर ठाकरे, अमोल चौधरी यांचे सह कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवून चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी यवतमाळ ग्रामीण पोलिस स्टेशन चे पोलीस निरीक्षक किशोर जूनघरे यांनी आपल्या पथकासह कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©