Breaking News यवतमाळ सामाजिक

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज यवतमाळ शहरातील विविध लसीकरण केंद्रावर भेट देऊन पाहणी केली तसेच लसीकरणाला आलेल्या नागरिकांशी संवाद साधला.

गेल्या 24 तासात 19 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2245 बेड उपलब्ध

यवतमाळ, दि. 26 जून : गेल्या 24 तासात जिल्ह्यात 15 जण पॉझेटिव्ह तर 19 जण कोरोनामुक्त झाले आहे. जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 993 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 15 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 978 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 54 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72707 झाली आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 70867 झाली आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1786 मृत्युची नोंद आहे.

आज पाॅझेटिव्ह आलेल्यांमध्ये बाभूळगाव, दारव्हा, कळंब, नेर व पांढरकवडा येथील प्रत्येकी एक रुग्ण तर महागाव तीन, पुसद दोन व पांढरकवडा येथील पाच रूग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यत 6 लक्ष 78 हजार 332 चाचण्या झाल्या असून त्यापैकी 6 लक्ष 05 हजार 594 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 10.72 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 1.51 आहे तर मृत्युदर 2.46 आहे.

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2245 बेड उपलब्ध: जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 34 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 2279 आहे. यापैकी 34 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 2245 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 577 बेडपैकी 19 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 558 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 526 बेडपैकी 13 रुग्णांसाठी उपयोगात तर 513 बेड शिल्लक आणि 34 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 1176 बेडपैकी 2 उपयोगात तर 1174 बेड शिल्लक आहेत.

__________________________________

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचा यवतमाळ जिल्हा दौरा

यवतमाळ, दि. २६ : सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाचे मंत्री धनंजय मुंडे हे यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम खालीलप्रमाणे आहे.

सोमवार दिनांक 28 जून 2021 रोजी सकाळी 10 वाजता माहुरगड येथून मोटारीने उमरखेड जि. यवतमाळकडे प्रयाण. सकाळी 11 वाजता उमरखेड विधानसभा मतदारसंघ आढावा बैठकीस उपस्थिती. सकाळी 11.45 वाजता उमरखेड येथून मोटारीने वारंगामार्गे कळमनुरी जि. हिंगोलीकडे प्रयाण.

_______________________________

जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील यांचा यवतमाळ जिल्हा दौरा

यवतमाळ, दि. 26 : जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील हे यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम खालीलप्रमाणे आहे.

सोमवार दिनांक 28 जून 2021 रोजी सकाळी 10 वाजता माहुरगड येथून मोटारीने उमरखेड जि. यवतमाळकडे प्रयाण. सकाळी 11 वाजता उमरखेड विधानसभा मतदारसंघ आढावा बैठकीस उपस्थिती. सकाळी 11.45 वाजता उमरखेड येथून मोटारीने वारंगामार्गे कळमनुरी जि. हिंगोलीकडे प्रयाण.

Copyright ©