यवतमाळ सामाजिक

खापरी चौफुलीवर भाजपाचे चक्काजाम आंदोलन

———————————————–
अर्धा तास वाहतूक प्रभावित
———————————————–
घाटंजी – ओबीसींचे राजकीय आरक्षण राज्यातील महाविकास आघाडी सरकारने ओबीसींचा इंपीरिकल डाटा सर्वोच्च न्यायालयात सादर न केल्याने हे आरक्षण रद्द झाले आहे. हा प्रकार राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे घडला. ओबीसी विरुद्धचा व्देष्टेपणा या भूमिकेतून स्पष्ट झाला असल्याने घाटंजी भाजपा व ओबीसी मोर्चाच्या वतिने बहुसंख्य ओबीसी बांधव व भाजपा नेते व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत खापरी येथिल चौफुलीवर चक्काजाम आंदोलन आज शनिवार ला करण्यात आले.चक्काजाम झाल्यामुळे घाटंजी-यवतमाळ वाहतुकिवर अर्धा तास प्रभाव पडल्याने पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन सोडले यावेळी आंदोलकांनी राज्य सरकारच्या धोरणाविरुद्ध बॅनर झळकविले व घोषणाबाजी केली या आंदोलनात भाजपा ता.अध्यक्ष राजु शुक्ला,शहराध्यक्ष नामपिल्लेवार सर,मोहनजी जाधव,मा.नगराध्यक्ष राम खांडरे,ओबिसी मोर्चा ता.अध्यक्ष अनिल कोठेकर,मनोज हामंद, संदिप माटे,अशोक राठोड यांचेसह मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©