यवतमाळ सामाजिक

मेहुनाच बनला जवाईचा हत्याऱ्या

करन खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार हा करण चा मेहुनाच असल्याचे अर्थात त्याची पत्नी आशा परोपटे वय 27 राहणार राणी अमरावती तिचा सख्खा भाऊ यांनी आपल्या इतर साथीदारासह करन याची धारधार शस्त्र व देशी कट्याचा वापर करून हत्या केल्याची घटना स्टेट बँक चौकात 23 तारखेच्या सायंकाळी 8.30 च्या दरम्यान थरारक घटना घडली यात इतर त्याचे सह आशिष उर्फ बगीरा दांडेकर वय 30 राहणार चामेडीया नगर,शुभम बघेल वय 25 राहणार वैभव नगर, धिरज उर्फ बँड वय 25 वर्ष राहणार संदीप टॉकीज च्या मघे ,गौरव गजबे राहणार चांदोरे नगर ,प्रवीण उर्फ पिके केराम वय 28 वर्ष राहणार पिंपळगाव, दिनेश तुरकाने 25 वय राहणार मानोरी बाभूळगाव, कल्याण उर्फ निलेश मडावी वय 28 दिलीप ठकर वय 25 अर्जुन भांजा वय 30 राहणार दिघोरी नाका नागपूर, या दहा आरोपीं पैकी अक्षय राठोड हा पुण्याला असल्याची माहिती दिली तसेच माहिती दिल्याचा संशय तसेच रेतीचा व्यवसाय व त्यामधील दरार वर्चस्व हरविल्याची भीती आर्थिक वर्चस्व ठेवणे याकरिता तसेच बहिणीचे दुसऱ्या जातीच्या मुलासोबत विवाह केला ही माहिती असून सुद्धा अक्षयच्या सांगण्यावरून आशिष व शुभम बघेल या दोघांनी करणवर चाकूने वार करून बंदुकीचे फायरिंग केले व जिवानिशी ठार मारले तर उर्वरित आरोपींना या हत्येचा कट करून हत्या करण्यात मदत केली या प्रकरणात ज्या ठिकाणी त्यांची हत्या झाली त्या ठिकाणी गंगाप्रसाद गुप्ता यांची चहा कॅन्टीन असून त्याला आशिष शुभम धीरज यांनी गोळी झाडून पायाला जखमी केले तो जखमी झाला अशी लेखी तक्रार आशा परोपटेने दिल्यावरून शहर पोलिसांनी दहा आरोपीविरुद्ध कलम 302 307 109 120 ब भां, द.वी कलम 4 /25/ आर्म ॲक्ट कलम 3/ 2 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून या प्रकरणातील शहर पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक बेलखेडे व त्यांचे पथक पुढील तपास करीत आहे

Copyright ©