यवतमाळ सामाजिक

ग्रामपंचायत गणगाव येथे “एक गाव एक वडाचे झाड” उपक्रम

 

कोरूना काळामध्ये ऑक्सिजन अभावी तळमळणारे जीव आपण पाहिले. या काळात ऑक्सिजन ची सर्वाधिक गरज निर्माण झाली. वड आणि पिंपळ यासारखे वृक्ष 24 तास ऑक्सिजन निर्मिती करतात. एक पूर्ण वाढ झालेले वडाचे झाड सुमारे सहा हजार पौंड ऑक्सिजनचे उत्सर्जन करते. अक्षरशः लाखो रुपयाचे ऑक्सीजन विनामोबदला आपल्याला या वडाच्या झाडापासून मिळतात. शिवाय या झाडांमध्ये विविध औषधी गुणधर्म देखील आहेत त्यामुळे जिल्हा परिषदेच्या वतीने प्रत्येक गावात किमान एक वडाचे झाड लावण्याचा व त्यांचे जतन करण्याचा संकल्प जिल्हा परिषद अध्यक्षा सौ कालींदा ताई पवार यांच्या संकल्पनेतून समोर आला आणि जिल्ह्यातील प्रत्येक गावात ग्रामपंचायतीकडून “एक गाव एक वडाचे झाड” लावण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला.
यात आर्णी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत गणगाव येथे ग्रामपंचायत सदस्या सौ. निलिमा विलास खेरे व ग्रामसेवक विजयकुमार ठेंगेकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये वडाच्या वृक्षाचे रोपन करून पूजन करण्यात आले.
या कार्यक्रमास आशा वर्कर वैशालीताई अवझाडे, अंगणवाडी सेविका कलावतीताई मोरे, ग्रामपंचायत कर्मचारी अमोल धारपवार, ग्राम रोजगार सेवक ज्ञानेश्वर खोडके, शाळा मदतनीस सौ. मंगला शाम ठाकरे, सौ. सरिता सुनिल कोल्हे, सौ. लता राजेश कोल्हे, सौ. लता संजय ठाकरे, भाग्यश्री विजय सुरजूसे, सौ. कांता संजय खेरे, सुलुबाई ठाकरे यांच्यासह बऱ्याच महिला उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक, निवेदन व आभार प्रदर्शन ग्रामसेवक विजयकुमार ठेंगेकर यांनी केले.

Copyright ©