यवतमाळ सामाजिक

डॉ श्यामा प्रसाद मुखर्जी यांचे कार्य प्रत्येक भारतीयांना प्रेरणा देणारे :- आमदार प्रा डॉ अशोक उईके

 

एक देश मे दो विधान,दो प्रधान ,दो निशान नहि चलेंगे भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे विधान आज भारताचे प्रधानमंत्री नरेन्द्रजी मोदी यांनी खरे करून दाखविले डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे बलिदान व्यर्थ गेले नाही त्यांचे विचार प्रत्येक भारतीयांना प्रेरणा देणारे आहे असे विचार राळेगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रा डॉ अशोक उईके यांनी 23जून हा दिवस देशभर डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी स्मृती दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे त्या निमित्याने राळेगांव येथील भाजपा तालुका कार्यालयात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना विचार व्यक्त केले .डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी हे जनसंघाचे संस्थापक होते आज जगातील सर्वात मोठे संघटन त्यांच्या कार्यकर्तृत्वातून तयार झाले .भारतीय जनता पार्टीच्या सरकारने 370 कलम जम्मू काश्मीर मधील रद्द करून देश एक संघ केला व डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी नी दिलेले बलिदान व्यर्थ जाऊ दिले नाही आम्हा सर्व भारतीयांना हे प्रखर व देशस्वाभिमान शिखविणारे विचार प्रेरणा देत राहील असेही उईके पुढे बोलतांना म्हणाले या कार्यक्रमा च्या सुरवातीला डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष तथा जिप सदस्य चित्तरंजन कोल्हे, समिती सभापती प्रशांत तायडे ,भाजपा जिल्हा सरचिटणीस ऍड फ्रफुल चव्हाण,भाजपा शहर अध्यक्ष डॉ कुणाल भोयर,जिल्हा परिषद सदस्य सौ उषाताई भोयर ,बबनराव भोंगारे,अरुण शिवणकर,किशोर जुणूनकर,डॉ भीमराव कोकरे,बाळासाहेब दीघडे,अभिजित कदम ,सौ छायाताई पिंपरे,गजानन लढि, माजी सरपंच सुधाकर गेडाम,सौ संतोषी वर्मा,पारस वर्मा,डॉ पोटदुखे मॅडम,मडावी मॅडम,विनायक महाजन,आकाश कुळसंगे ,प्रफुल कोल्हे,दीपक भोयर यांचे सह भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात हजर होते

Copyright ©