यवतमाळ सामाजिक

यवतमाळ जिल्हा प्रोफेशनल टिचर्स असोसिएशन, र. न. 380 च्या प्रयत्नांना यश

यवतमाळ जिल्ह्यातील खाजगी क्लासेस सुरू करण्यास जिल्हा प्रशासनाचा हिरवा कंदील ”
यवतमाळ: मा. जिल्हाधिकारी साहेब यांनी यवतमाळ जिल्ह्यातील खाजगी क्लासेस, नियम व अटींचे पालन करण्याच्या अधीन राहून सुरु करण्याची परवानगी दिली असून क्लास संचालकांचे गेले 15 महिने बंद असलेले सर्वप्रकारचे क्लासेस सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
यवतमाळ जिल्हा प्रोफेशनल टिचर्स असोसिएशन, र. न. 380 सलग्न महाराष्ट्र राज्य प्रोफेशनल टिचर्स असोसिएश क्लासेस सुरु व्हावेत म्हणून सतत प्रयत्न करीत होती शेवटी सर्व कार्यकारिणी सदस्यांचे अथक परिश्रम कामी आले
.कोरोणा व्हायरस मुळे १६ मार्च पासून यवतमाळ जिल्ह्याभरातील शिकवणी वर्ग बंद ठेवण्यात आल्यामुळे, शिकवणी वर्ग संचालक आर्थिक विवंचनेत सापडलेला होता.सर्व उत्पन्नाचे मार्ग बंद असल्यामुळे शिकवणी वर्गाचे भाडे , घरभाडे, विजबिल, bank EMI, भरणे कठीण जात होते तसेच जिल्ह्यातील पालकांची नाजुक आर्थिक परिस्थिती आणि तंत्रज्ञानाच्या अभावामुळे online क्लासेस सुद्धा कुचकामी ठरलेले होते . ग्रामीण भागात ९०% पालक smartphone घेऊ शकत नाही. एखाद्या पालकांजळ फोन असते तर नेटवर्क नसते. Online क्लासेसमुळे मुलांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचे सुद्धा निदर्शनास आले आहे त्यामुळे पालक, विद्यर्थी आणि शिकवणी वर्ग संचालक, मागील 15 महिण्यापासून बंद असलेले क्लासेस सुरु होण्याची वाट बघत होते सदर बाब यवतमाळ जिल्हा प्रोफेशनल टिचर्स असोसिएशन, र. न. 380 ने मा. जिल्हाधिकारी साहेबांना वारंवार भेटून निदर्शनात आणून दिली. मा. जिल्हाधिकारी साहेबांनी बेरोजगारीवर मात करून स्वयंरोजगार निर्माण केलेल्या शिकवणी वर्ग संचालकांची परिस्थिती लक्षात घेऊन शिकवणी वर्ग सुरु करण्याचे आदेश काढले त्याबद्दल यवतमाळ जिल्हा प्रोफेशनल टिचर्स असोसिएशन, र. न. 380 तर्फे विदर्भ विभागीय अध्यक्ष योगीराज अरसोड, जिल्हाध्यक्ष संजय पवार, उपाध्यक्ष शैलेश दुबे, सचिव योगेंद्र भुसे , संघटक मोहनसिग शेर, महीला जिल्हाध्यक्ष सौ. अस्मिता वैद्य, मार्गदर्शक अनिल चिंचोळकर, कोषाध्यक्ष संदीप देवपारे, प्रसिद्धी प्रमुख चंद्रशेखर आष्टेकर, मार्गदर्शक संदीप चिंतलवार,राजकुमार राठी , आनंद विधाते, विकास वेणुरकर, राजेश खोडे , दिलीप घोडेराव प्रदीप गुल्हाने, मधुकर लिहितकर, सौ. भक्ती शेनमारे, सौ. मेघा भास्करवार, सौ. वैशाली टोणे ,सौ. अंजली माटे, सौ. विद्या नरहरशेट्टीवार, सौ. अँड. सीमा दुगड, संजय गावंडे, एय्याज खान, पियुष ठाकरे अमोल चेपे, मुफ्फद्ल भारमल, डॉ. रविश खान, रविंद्र खोडे, दिनेश वडेरा, विनोद भोसले, हार्दिक मांडवीया, राम राठी रमीज शेख, प्रवीण शेटे, विवेक सुपारे , दिनेश बिसेन, संतोष पंडागडे, राम धारणे, आशिष चमेडिया, तजिंदरसिग चावला ,अजिंदार चावला , चंदन गायकवाड, प्रियांक राठी, अभिजित पोजगे, डॉ. निलेश उईके. अमोल चंद्रे, दयानंद पुडके, अमोल गुल्हाने, गुणवंत जाधव, रविंद्र इंगोले, सुरज चव्हाण, दिक्षांत रामटेके, मोझरकर मॅडम, राउत मॅडम, ठोसर मँडम, लुणावत मॅडम, केळापुरे मॅडम, सरमुकरदम मॅडम,सरोदे मॅडम, रायचुरा मॅडम, डॉ. अर्चना राउत मॅडम, शितल राठी मॅडम, जिनत मॅडम
तहसील अध्यक्ष, घाटंजी : प्रविण वानखडे, पुसद : संजय शेवगावकर, राळेगाव : मनोज येंडे, वणी : कुंतलेश्वर तुरविले, कळंब : सुजित गोरे, उमरखेड : संतोष गुजर, दारव्हा : उमेश जामदारकर , आर्णी : महेंद्र चौधरी, नेर : संतोष दारव्हटकर, दिग्रस : शेख अमर , मारेगाव : नितीन काटकर , बाभूळगाव : शब्बीर खान, पांढरकवडा: सागर लहामगे यांनी. मा. जिल्हाधिकारी साहेबांचे जाहीर आभार व्यक्त केले.

      आपला विश्वासू

श्री.योगीराज अरसोड (यवतमाळ )
राज्य कोअर सदस्य तथा विदर्भ अध्यक्ष,प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन,
महाराष्ट्र राज्य
9822716201

Copyright ©