यवतमाळ सामाजिक

घाटंजी येथे तालुका बाल संरक्षण समितीची बैठक

घाटंजी: महाराष्ट्र शासन महिला व बाल विभाग जिल्हा बाल संरक्षण कक्ष व एकात्मिक बाल विकास प्रकल्प घाटंजी यांच्या वतीने तहसील कार्यालय येथे तालुका बाल संरक्षण समितीची बैठक घेण्यात आली .
अध्यक्ष स्थानी प्रभारी तहसीलदार तथा अध्यक्ष तालुका बाल सरंक्षण समिती एम.एस.होटे होते. यावेळी प.स. शिक्षण विभाग प्रतिनिधी,मानव लढे , विकासगगा संस्था प्रतिनिधी भाऊ तम्मेवार, निता सूरसकर, अरुण कांबळे, शांतिकुमार राठोड, शीतल वणकर , प्रिया थुल,पोलीस विभागाचे विलास सिडाम ,एकात्मिक बाल विकास अधिकारी तथा सचिव वामन नवनाथ, जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे संरक्षण अधिकारी माधुरी पावडे उपस्थित होते
यामध्ये बालकाच्या समस्या व सध्यास्थिती कोरोना मुळे ज्या मुलांचे पालक गमावले व एकल पाल्य बालकाचे सर्वेक्षण व माहिती कशी गोळा करावी, सर्व गावात गाव बाल संरक्षण समिती ची स्थापना करणे, बालविवाह, बालमजुरी प्रतिबंध, बाल लैंगिक अत्याचार कायदा यावर जनजागृती करणे.
तसेच जनजागृती करण्या करीत ग्राम पंचायत १०% निधी खर्च करणे याविषयावर चर्चा करण्यात आली. कोरोना मुळे मय्यत झालेल्या पालकांची माहिती व एक पाल्य बालकांची माहिती घेण्याबाबत अंगणवाडी सेविका मार्फत सर्वेक्षण करण्यात येवून ऑनलाईन माहिती भरण्यात येत आहे. अनाथ व एकल बालक यांच्या बाल संगोपन योजना माहिती देण्यात आली बालविवाह विषयी कायदाच्या माहिती सर्व ग्रामसेवक यांची एक दिवसीय प्रशिक्षण घेण्याबाबत चर्चा झाली. अनाथ एकल्य पाल्य बालकांना व कुटुंबाना विविध सामाजिक योजनासी सर्व विभागातील योजना जोडण्याबाबत व सर्व विभागांनी एकत्र येऊन काम करण्याबाबत चर्चा झाली. यात महसूल पंचायत पोलीस शिक्षण आरोग्य विभाग तसे स्वयंसेवी संस्था चे प्रतिनिधी उपस्थित होते
कोविड विषाणूच्या प्रादुर्भावामुळे आई- वडिलांचे छत्र हरपल्याने अनाथ झालेल्या बालक सक्षम होईपर्यंत (१८ वयोगटातील) बालकांचा बालसंगोपन योजने बाबत चर्चा करण्यात आली 18 वर्षातील मुले शाळाबाह्य राहणार नाही त्याकरिता उपाययोजना करणे बालकांच्या आरोग्याची काळजी घेण्याबाबत बैठीकित सविस्तर चर्चा करण्यात आली या तालुका बैठकीत अनाथ व एकल पाल्य मुलांच्या सर्वेक्षण व माहिती गोळा करण्याबाबत सूचना देण्यात आल्या .

Copyright ©