यवतमाळ सामाजिक

राळेगांव तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने वृक्षारोपण

सामाजिक बांधिलकी जोपासत राळेगाव तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने दिं २२ जून २०२१ रोज मंगळवार ला वृक्षारोपण करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन राळेगाव तालुका पत्रकार संघटना व सामाजिक वनीकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
हे वृक्षरोपन एच पी जिनिंग समोरील वनीकरण विभागाच्या खाली जागेत करण्यात आले असून यावेळी पी एल शिरसाट प्रणित ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष ओंकार चेके, सचिन चौधरी, पवन धोत्रे,तसेच सामाजिक वनीकरण विभागाचे संजय केराम,मिलिंद राठोड,नामदेव अक्कलवार,दीपक पाटील, राळेगाव तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष प्रा. अशोक पिंपरे ज्येष्ठ पत्रकार प्रकाश मेहता, डॉ.के एस वर्मा, महेश शेंडे, प्रा. मोहन देशमुख, राजेश काळे, मंगेश राऊत,राष्ट्रपाल भोंगाडे, फिरोज लाखांनी महेश भोयर,संजय दूरबुडे,प्रमोद गवारकर, दीपक पवार, मंगेश चवरडोल, अजीज शेख, दिनेश सराटे, सचिन राडे, शालीक पाल, श्रीकांत कवाडे, विनोद चिरडे, रणजित परचाके, गुड्डू मेहता, राजू काळे,रितेश भोंगाडे, शंकर जोगी,जावेद पठाण,आदी उपस्थित यावेळी राळेगांव पत्रकार संघटनेची सभा घेण्यात आली होती या सभेत पुढील काळात सामाजिक उपक्रम राबविणे व पत्रकारांचे संघटन मजबूत करणे पत्रकारावर होणाऱ्या अन्यायाचा पत्रिकार करणे यासह अनेक बाबींवर चर्चा करण्यात आली.

Copyright ©