यवतमाळ सामाजिक

वृद्धाश्रमातील वृद्धांना कपड्यांचा भर आहेर देऊन जन्मदिन केला साजरा

 

तहसीलदार राजेश वझीरे यांचा जन्मदिन नागसेन वृद्धाश्रमात वृद्धान सोबत स्नेह भोजन करून आठवणीतला जन्मदिन म्हणून केला साजरा

स्वतःचा परिवार घडविण्यासाठी घरातील प्रत्येक आई – वडीलाचा मोलाचा वाटा असतो त्यासाठी आपले मुलं बाळ योग्य शिक्षण घेऊन खूप मोठे व्हावे असे स्वप्न प्रत्येक आई – वडील बघत असतात त्यांचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी रोजमजुरी सारखे कबाड कष्ट करून आपल्या मुलांचे पालन पोषण तसेच योग्य शिक्षण देऊन त्यांना मोठं करण्यात आई वडिलांचा मोलाचा सहभाग असतो,परंतु जेव्हा पालन पोषण झाल्यावर मुलं मोठे होतात कुणी मोठ्या पदावर जातात तेव्हा ते स्वतः मोठा झाल्याचा त्यांना भास होतो व त्यांना मोठे करणाऱ्या आई वडिलांनाच विसरून त्यांच्या आधाराच्या वेळी त्यांना घरात राहू न देता रस्त्यावर सोडून देतात तेव्हा अशा वृद्धांनी नाइलाजाने सर्व काही असतांना वणवण भाकरीसाठी भटकावे लागते हीच मोठी शोकांतिका आहे. अशाच वृद्धांना आधार देण्यासाठी हरसूल येथील नागसेन मानकर वृद्धाश्रम सरसावले असून या वृद्धाश्रमात आलेल्या वृद्धांना सर्व सोयी उपलब्ध असून वृद्धांच्या जेवण खाण्यासह त्यांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी सदैव प्रयत्नात असतात.वृद्धांच्या सर्व अडचणी दूर करण्यासाठी या वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक आनंद गायकवाड नेहमी तत्पर असतात.
याच वृद्धाश्रमात दिग्रस तहसीलचे कर्तव्यदक्ष तहसीलदार राजेश वझीरे यांनी आपला वाढदिवस समाजीक कार्य करून करावे असा संकल्प करून त्यांनी हरसूल येथील नागसेन मानकर वृद्धाश्रमात सर्व वृद्धांना परिपूर्ण कपड्याचा आहेर देऊन सामाजिक बांधिलकी जोपासल्याने त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. सर्व प्रथम तहसीलदार राजेश वझीरे त्याच्या पत्नी सौ.सीमा व आई वडील यांनी वृद्धाश्रमात प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.यावेळी वृद्धाश्रमातील जिजाबाई यांनी पाहुण्याच्या स्वागतासाठी ” आज इथल्या सोहळ्याला चंदनाचा गंध आला ” या गाण्याने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.तद्नंतर तहसीलदार राजेश वझीरे सह परिवाराचे मानकर कुटूंबियांकडून पुष्पहार शाल देवून स्वागत करण्यात आले.
तहसीलदार वझीरे यांचा केक वृद्धाश्रमातील वृद्धांच्या समवेत कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.यावेळी तहसीलदार वझीरे व त्यांच्या परिवाराने सर्व वृद्धांना केक भरवला व सर्वांना परिपूर्ण कपड्याचा आहेर देऊन वृद्धासोबत सर्व परिवारासोबत जेवण करून वाढदिवस आगळ्या वेगळ्या सामाजिक उपक्रमातून साजरा केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे. दिग्रस तालुक्याचे तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार साहेब आपल्या सोबत घेऊन जेवण करणार आहेत असे समजताच वृद्धाश्रमातील उत्कृष्ट आवाजातील मंजुळ आवाजात गीत गाणाऱ्या जिजाबाई भगत आणि अनेकांच्या गायनाच्या माध्यमातून स्वागत आणि मनोरंजन करण्यात आले सोबतच तहसीलदार राजेश वजीरे यांचा फोटो केक नागसेन मानकर वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक आनंद गायकवाड यांनी आणल्यामुळे आणखीनच या आनंदात भर पडली वृद्धाश्रमाकडून अशा मनमोहक पद्धतीचे स्वागत करण्यात आल्यानंतर तहसीलदार राजेश वजीरे यांचे मन भरून आले आणि त्यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना माझा हा वाढदिवस माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय झाला आहे असे सुद्धा यावेळी मत व्यक्त केले या कार्यक्रमात रिपाई जिल्हाध्यक्ष महेंद्र मानकर,पंचायत समिती दिग्रस चे माजी सभापती मिलिंद मानकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.कृष्णदास बानोत,तलाठी भावेश ढोले,ICICI बँकेचे मॅनेजर पंकज सपाटे,बालाजी अर्बन बँकेचे उपाध्यक्ष प्रा.यशवंत सुर्वे पाटील, ॲड राहुल तूपसुंदरे,झिरपूरवाडी सरपंच पुरुषोत्तम कुडवे,पत्रकार किशोर कांबळे,पत्रकार सदानंद जाधव,पत्रकार अजीज शेख,सह अनेक पत्रकार बांधव उपस्थित होते.यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मधुकर वाघमारे प्रस्ताविक पत्रकार धर्मराज गायकवाड तर आभार सामाजिक कार्यकर्त्या उज्वला मानकर यांनी केले

Copyright ©