यवतमाळ सामाजिक

पोलीस मित्र युवा महासंघाच्या जिल्हा सरचिटणीस पदी जावेद अली ईमदाद अली काझी यांची निवड

———————————————-
यवतमाळ तालुक्यातील रुई (वाई) येथिल सामाजिक कार्यकर्ते युवा नेतृत्व सदैव सामाजिक कार्यात झोकून घेणारे, जनतेसाठी झटणारे सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात सैदव सक्रिय राहून कार्य करीत राहणारे जावेद अली ईमदाद अली काझी यांच्या कार्याची दखल घेऊन पोलिस मित्र युवा महासंघाच्या जिल्हा सरचिटणीस पदी निवड करण्यात आली.
विविध क्षेत्रातील असलेली समस्या त्या सोडविण्यासाठी सतत धडपड करून सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहून पोलिस प्रशासन व परिवार यांच्यावर विविध प्रकारे अन्याय सोबतच सामान्य नागरिकांच्या न्याय हक्कांसाठी लढा देत त्यांना सहकार्य करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हे कार्य सोपस्कार पार पाडतील हा मूळ उद्देश पुढे करून जावेद अली ईमदाद अली काझी यांची पोलीस मित्र युवा महासंघाच्या जिल्हा सरचिटणीस पदी निवड महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. नितीनजी जयस्वाल, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब ढमाले, अड. नम्रता थाडा, संस्थापक सचिव अड. गजानन मांटे, यवतमाळ जिल्हा अध्यक्ष अक्षय राठोड, जिल्हा उपाध्यक्ष राजेश राठोड, यांनी केली असून महासंघाच्या भरीव बांधणीस कार्य करावे असे नमूद करून त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

Copyright ©