यवतमाळ सामाजिक

जागतिक योग दिन साजरा

सेवाग्राम : सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान अंतर्गातील महात्मा गांधी आश्रमात नेहरू युवा केंद्र( भारत सरकार) वर्धा व पतंजली योग पिठ यांच्या वतीने जागतिक योग दिवस साजरा करण्यात आला.
सुरूवात प्रार्थनेने झाली.यात विविध आसने,प्राणायाम, कपालभाती, अनुलोम विलोम,नाडिशशोधन,धर्मानं,शांतीपाठ आणि संकल्प इ.सह माहिती व मार्गदर्शन करण्यात आले.यासाठी पतंजली योग पीठ चे हिरीद्वार वर्धा चे रविकुमार व महेश दुबे यांनी प्रात्यक्षिक करून दाखवून करून घेतले.
या प्रसंगी नेहरू युवा केंद्राचे समन्वयक शिवधन शर्मा, दयाराम रामटेके,रवी राठोड,प्रफुल्ल कुकडे,भैय्या जुमडे,अमोल भोयर,दिलीप चव्हाण,जयश्री भोयर, ऐश्र्वर्या भोयर,संगिता चव्हाण,आरुषी चव्हाण,रिया शर्मा इ.सह कार्यकर्ते उपस्थित होते.

Copyright ©