Breaking News महाराष्ट्र सामाजिक

मान्सून सुरू होण्याआधी लोकांनी इन्फ्लुएन्झाची लस घेण्याचे तज्ज्ञांचे आवाहन

• सरता उन्हाळा आणि मान्सूनकाळामध्ये येणा-या इन्फ्लुएन्झाच्या मोसमाचा वेळच्यावेळी प्रतिबंध करण्यासाठी पावसाळ्यापूर्वी लस घेण्याचा तज्ज्ञांचा सल्ला
• ६ महिने ते ५ वर्षांपर्यंतची मुले फुफ्फुस, किडनी, हृदयाची जुनी दुखणी, मधुमेह, अस्थमा असे इतर आजार असलेल्या व्यक्तींना इन्फ्लुएन्झाचा संसर्ग होण्याचा सर्वाधिक धोका
• गर्भवती महिलांनी आपल्या प्रसूतीतज्ज्ञांचा सल्ला घेऊ लस घेतल्यास ६ महिन्यांहून कमी वयाच्या बाळांना संरक्षण मिळू शकेल

नागपूर, २१ जून २०२१- अलीकडेच बालरोगतज्ज्ञांचा समावेश असलेल्या टास्कफोर्सच्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या व्हर्च्युअल बैठकीमध्ये लहान मुलांना इन्फ्लुएन्झाची लस देण्याचा विषय चर्चेला आला. इन्फ्लुएन्झा आणि कोव्हिड या दोन्ही आजारांमध्ये काही लक्षणे समान आढळतात व इन्फ्लुएन्झाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्यास त्यामुळे आरोग्यसेवा यंत्रणेवर अतिरिक्त भार येऊ शकेल.

इन्फ्लुएन्झा लसीचे फायदे सांगताना कन्सल्टन्ट पीडीअट्रिशियन आणि इंडियन अकॅडमी ऑफ पीडिअट्रिक्सचे माजी अध्यक्ष डॉ. विजय येवले सांगतात, “इन्फ्लुएन्झाचे बहुतांश रुग्ण हे पावसाळ्यात आढळतात व त्यामुळे लहान मुलांमध्ये या आजाराची तीव्र लक्षणे आढळू शकतात. रुग्णसंख्येमध्ये अशाप्रकारे अचानक मोठी वाढ झाल्याने आरोग्यक्षेत्रातील पायाभूत सुविधांवर तर ताण येतोय पण त्याचबरोबर अकारण हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागते आणि चाचण्या करून घ्याव्या लागतात.

इन्फ्लुएन्झाची लस ही दरवर्षी आपल्या जनुकीय संरचनेत बदल करणा-या मोसमी विषाणूंविरोधात एक संरक्षक ढाल पुरवते. म्हणूनच इन्फ्लुएन्झा लस ही दरवर्षी मान्सून सुरू होण्याच्या आधी घ्यायला हवी. कोव्हिडच्या रुग्णांना देखभाल पुरविताना आपण मागे न राहणे महत्त्वाचे आहे. ६ महिन्यांपासून ते ५ वर्षांपर्यंतच्या वयोगटातील मुलांना तसेच इतर आजार असलेल्या रुग्णांनी इन्फ्लुएन्झाची लस घ्यायला हवी. त्याचबरोबर कोव्हिड लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या वयोवृद्ध व्यक्तींनीही आपल्या डॉक्टरांशी सल्लामसलत करून फ्लूची लस घ्यायला हवी.”

पालकांनी आपल्या मुलांचे लहानपणीच लसीकरण करण्यास प्राधान्य द्यावे असा सल्लाही तज्ज्ञ मंडळी देतात, कारण ती एक अत्यावश्यक आरोग्य सेवा आहे. मुलांना आणि विशेषत्वाने लहान बाळांना डिप्थेरिया, टिटॅनस, पर्ट्युसिस, हेपटायटीस बी, पोलियोमायलिटीस आणि एच. इन्फ्लुएन्झा टाइप बी यांसारख्या आजारांविरोधात संरक्षक कवच पुरविण्यासाठी देण्यात येणा-या प्राथमिक लसी तर लवकरात लवकर दिल्या पाहिजेत. लसीकरणाला विलंब झाला तर त्यामागोमाग द्यायच्या लसीच्या डोसांचे वेळापत्रक कोलमडू शकते. असे झाल्यास एरवी वेळच्यावेळी लस दिल्याने मुलांना ज्या आजारांपासून संरक्षण मिळाले असते ते आजार त्यांना होण्याची शक्यता वाढते कारण त्यांना त्याविरोधात संरक्षणच मिळेल.

महाराष्ट्राच्या पीडीअट्रिक टास्कफोर्सचा एक एक भाग म्हणून डॉ. विजय येवले यांनी लोकांना पुढील गोष्टींच्या शिफारसीही केल्या आहेत.
• आपल्या डॉक्टरांच्या संपर्कात रहा आणि मुलांचे लसीकरण चुकवू किंवा लांबवू नका. अपॉइंटमेंट निश्चित केल्यानंतरच क्लिनिकला भेट द्या.
• दिवसातल्या गर्दीच्या वेळी डॉक्टरांना भेटणे टाळा. त्याऐवजी क्लिनिकमध्ये रुग्णांची वर्दळ कमी असेल अशी वेळ भेटीसाठी निवडा. यामुळे मुले कमीत-कमी माणसांच्या संपर्कात येतील.

कोव्हिड-१९ ने लसीकरणाचे महत्त्व कधी नव्हे इतकी ठळकपणे आपल्यासमोर आणले आहे, तरीही अनेक जण इन्फ्लुएन्झासारख्या लसीकरणाद्वारे अटकाव करता येण्याजोग्या आजारांविरोधात (vaccine preventable diseases – VPDs) प्रतिबंधात्मक यंत्रणा म्हणून लस घेण्यास टाळाटाळ करत असतात. फ्यूची लक्षणांची तीव्रता ही हवामानावर अवलंबून असते, त्यामुळे हा एक मोसमी आजार ठरतो. भारतामध्ये उन्हाळा आणि मान्सूनदरम्यान इन्फ्लुएन्झाच्या रुग्णांची संख्या कळस गाठते. भारतासारख्या विकसनशील अर्थव्यवस्थेने पॅनडेमिकविरोधात सुरू असलेल्या लढ्यामध्ये सहभागी होणे, ज्या आजारांना अटकाव होऊ शकतो अशा आजारांच्या प्रतिबंधासाठी आवश्यक ती खबरदारी घेणे ही काळाची गरज आहे. इन्फ्लुएन्झा लस ही इन्फ्लुन्झाविरोधात अशी प्रतिबंधात्मक यंत्रणा खात्रीने पुरवू शकते.

Copyright ©