यवतमाळ सामाजिक

सायफळ येथील पाणी पुरवठा दहा दिवसापासून बंद

घाटंजी :तालुक्यातील शेवटच्या टोकावर येणाऱ्या सायफळ येथे गेलेदहा दिवसापासून पाणी पुरवठा बंद असून याकडे ग्रामपंचायत चे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे सायफळ येथील ग्रामस्थांना ग्रामपंचायत पाणी पुरवठा व्यतिरिक्त गावात ईतर कोणतेही स्त्रोत नसल्याने ग्रामपंचायत च्या पाणी पुरवठ्यावर अवलंबून रहावे लागते मात्र गेल्या दहा दिवसापासून पाणी पुरवठा बंद असून अद्यापही ग्रामपंचायत ने पाणी पुरवठा बदल कोणतेही पावले उचलत असल्याचे दिसून येत नाही सायफळ गावात मोठ्या प्रमाणात शेतकरी शेतमजूर असून सध्या शेतातील कामाचे मुख्य दिवस असून मात्र पाण्यासाठी शेतातील कामे सोडून घरी राहावे लागत असल्याचे चित्र सायफळ गावात पाहायला मिळत आहे. गावापासून काही अंतरावर एक विहीर असून त्या विहीर मध्ये पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचले असून त्या विहीरीतील पाण्याचे अद्यापही निर्जंतुकीकरण करण्यात आले च नाही त्या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात अळ्या दिसून येत आहे तेच पाणी गावातील ग्रामस्थ पिण्यासाठी वापरत असल्याचे दिसून येत आहे पावसाळ्याचे दिवस असल्याने गावात रोगराई पसरू नये यासाठी शासन लाखो रुपये खर्च करते मात्र सायफळ ग्रामपंचायत जनतेला शुद्ध पाणी पिण्यासाठी मिळावे यासाठी कोणतेही पावले उचलत नसल्याचे दिसून येत आहे.

Copyright ©