यवतमाळ सामाजिक

कळंब येथील आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

 

कळंब :- येथील आज दि. 21 जून 2021 रोजी सकाळी 6.30 वाजता भारतीय जनता पार्टी कळंबच्या वतीने व पतंजलि योग समितीच्या वतीने योग शिबिराचे आयोजन माटे मंगलम येथे आज आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. भारतीय प्राचीन संस्कृती, परंपरा यांमध्ये योग, योगासने, योगसाधना यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. अगदी प्राचीन काळापासून ऋषीमुनी, साधुसंत यांनी वेळोवेळी योगाचे महत्त्व, त्याचे फायदे आणि त्याची गरज पटवून दिलेली आहे.

आंतरराष्ट्रीय योग दिनाची आपण थोडक्यात माहिती पाहुयात.

शारीरिक व मानसिक अनारोग्याचे निवारण व्हावे यासाठी नियमित योगासने करणे गरजेचे आहे, असा सल्ला अनेक योगाभ्यासक देतात. रोग निवारणाच्या या पद्धतीला आता आंतरराष्ट्रीय मान्यताही मिळालेली आहे.
२१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. संयुक्त राष्ट्रातील भारताच्या पुढाकाराने जगातील जवळपास सर्वच देशांनी निरोगी राहण्यासाठी योगाचा प्रसार करण्यासाठी या मोहिमेमध्ये भाग घेतला होता.
हा कार्यक्रम आमदार प्रा डॉ. अशोक उईके यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी कळंब तालुका देश कैलास बांद्रे, शहराध्यक्ष संदीप वैद्य, उपनगराध्यक्ष मनोज काळे, नगरसेवक राजू हारगुडे, पत्रकार अंबुरे सर, दोधल सर, अशोक गारघाटे, सुरेश होरे, निमकर भाऊ, तुषार शिंदे ,सतीश मरापे ,भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.

Copyright ©