Breaking News यवतमाळ सामाजिक

जोडमोहा चौकीवर वाहतूक पोलिसांची गलत पावती देवून पठाणी वसुली

———————————————–
शेतात येणार- जाणार शेतकऱ्यांना धरल्या जाते वेठीस
———————————————
पोलीस अधीक्षकांनी लक्ष देण्याची मागणी
———————————————-
जोडमोहा-: कोरोना काळात वेठीस सापडलेल्या शेतकरी बांधव कसातरी शेतीचे काम करून आपल्या आशा उजाळीत असतानाच गावापासून दूरवर असलेल्या शेतीवाले शेतकरी आपल्या मोटर सायकल वाहनाने शेतात काम करण्यासाठी जातात. यातच यवतमाळ ते चंद्रपूर महामार्गावरील जोडमोहा जवळील चौकी कित्येक वर्षांपासून बंद होती येथे दिवसाआड जिल्हा वाहतूक पोलिसांचा ताफा येवून शेतकऱ्यांना अडवणूक करून त्यांचा महत्त्वाचा वेळ घेवून उद्धट वागणूक देत दंडे मारून पैसे उकळून पठाणी वसुली करीत विनाकारण वेठीस धरून शेतकऱ्यांची पिळवणूक करीत आहे.
प्रथमतःच निसर्गाच्या अवकृपेमुळे व नापिकिने खचलेला शेतकरी बांधव इकडून तिकडून बियाण्याची जुळवा जुळव करून पेरणीच्या लगबगीने शेतातील कामासाठी शेतात जाण्यास आपल्या शेतात निघतो मात्र जोडमोहा चौकीवर दिवसाआड जिल्हा वाहतूक निर्दयी पोलीस हजर होवून त्यांना अडवितो थांबले नाही तर हातात असलेला दंडुका फेकून मारतो. यात थांबले तर कागदपत्राची चाचपणी करतो. शेतात जाणारा शेतकरी कागदपत्रे सोबत नेत नसल्याने त्याला कोणाला ५०० रुपये तर कोणाला ३०० रुपयाची मागणी करतात ते दिले नाही तर तासन् तास तिथे थांबवून ठेवल्या जाते. यात त्या शेतकऱ्यांचा पेरणीचा हंगाम वाया जाण्याचे चिन्ह निर्माण झाले आहे. अश्यातच सोमवार च्या सकाळ दरम्यान एक शेतकरी MH 26F0061 क्रमांकाची मोटर सायकल घेऊन शेतात जात असताना त्याला वाहतूक पोलीस याने अडविले व त्याला चांगलीच दमदाटी करून त्याला कागदपत्रे मागितले त्या शेतकऱ्याने मी शेतात जात असल्याने पाऊस वैगरे येईल व त्यात ते भिजून जाईल म्हणून सोबत आणले नाही. असे केविलवाणा प्रकार सांगितला मात्र या निर्दयी वाहतूक पोलीसाना दया आली नाही. शेवटी आपला वेळ वाया जातो आहे हे हेरून शेतकऱ्याने 500 रुपये तर नाही पण माझ्याकडे 200 रुपये आहे. हे घ्या व मला पावती द्या म्हणाले पावती देण्यास नकार देणारे महाशय अखेर पावती या शेतकऱ्याच्या माथी मारली. हा प्रकार नित्याचा झाला असून या वाहतूक पोलीस यांच्या हेकेखोर वृत्तीला शेतकरी बांधव बळी पडत असून त्यांच्या पेरणीच्या कामात बाधा निर्माण होत आहे. त्यामुळे बंद चौकीत दिवसाआड येवून पठाणी वसुली करणाऱ्या व चुकीच्या पावत्या देवून शेतकरी व शासनाची दिशाभूल करून स्वतः मलिदा लाटनाऱ्या वाहतूक पोलिसावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोडमोहा परिसरातील शेतकरी वर्गातून होत आहे.

Copyright ©