नागपूर सामाजिक

NTPC उठकी लोकांच्या जीवावर पुन्हा सांड नदीमध्ये केमिकल व दुषित पाणी सोडले.

सांड नदीमध्ये केमिकल दुषित पाणी सोडल्याने मौदा तालुक्यातील जवळपास ४०ग्रामपंचायतीला पाणी पुरवठा सांड नदीतून होत असल्याने जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत मौदा येथे तापेश्वर वैद्य व जनतेने आरडा – ओरड केली होती. यापुर्वी सांड नदीत केमिकलयुक्त पाण्यामुळे मासोळ्या, बेडके, साप आणि अन्य जलचर प्राणी मरुण सडा पडत होत्या. याबाबत तालुका प्रशासनाने स्वत: पाहणी करून बाधित गावांना टॅन्कर व्दारे पाणी पुरवठा केला मात्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने याबाबत कठोर कारवाई केली नाही त्यामुळे जनतेच्या मनात पाणी कुठे मुरते याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. दि. १८ शुक्रवार ला पुन्हा जनतेला सांड नदीमध्ये केमिकल युक्त दुषित पाणी वाहताना दिसले न वाटरुप मध्ये चर्चा गावागावात पसरली त्यामुळे जनतेच्या मनात पुन्हा भिती निर्माण झाली आहे.

Copyright ©