यवतमाळ सामाजिक

देशसेवेतील जवानांचे नाव हिवरी ग्रा. प. च्या दर्शनी भागाच्या फलकावर लावावे

उपसरपंच अभिजित मुरखे
यवतमाळ-: जिल्ह्यातील सर्वश्रृत असलेल्या हिवरी ग्राम पंचायतीच्या दर्शनी भागाच्या फलकावर या गावातील जे जवान आर्मी, सी. आर. पी. एफ., पोलीस दल, तसेच सन्यदलात राहून देशसेवा बजावत आहेत अश्या तरुण तरुणी चा सर्वांनी मनाशी आदर बाळगून त्यांचा एक सन्मान म्हणून नावे लिहन्यात यावी अशी सूचक मागणी हिवरी चे उपसरपंच अभिजित मुरखे यांनी केली आहे.
देशसेवेत प्राणपणाला लावून देश सेवा करणारे व पोलीस दल अश्या विविध क्षेत्रात कार्यरत राहून देशातील जनतेची सुरक्षा करणारे आपल्या रक्षणासाठी स्वतःसह आपल्या कुटुंबाची पर्वा न करता देश सेवा करीत आहे अश्या महान कर्तृत्ववान या गावातील तरुण व तरुणी यांचा आपल्याला अभिमान आहे. त्यांचे प्रती गावातील प्रत्येक नागरिकाने आदर करायलाच हवा त्याशिवाय या ग्राम पंचायत कार्यालयातील दर्शनी भागावरील फलकावर त्यांचे नाव लिहून त्यांना सलाम द्यावा. अशी मागणी उपसरपंच मुरखे यांनी केली आहे. ही मागणी सर्वांना मान्य असेलच असे सुध्दा उदगार ही त्यांनी या निमित्ताने यावेळी त्यांनी काढले.

Copyright ©