नागपूर सामाजिक

उमरेड विधानसभा क्षेत्रात खा. राहुल गांधी यांचा वाढदिवस साजरा.

——————————————–
वाढदिवसा निमित्त विविध वस्तूंचे वाटप
——————————————–
उमरेड- भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते खा. राहुल गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून उमरेड विधानसभा युवक काँग्रेस तर्फे त्यांचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात येवून त्यानिमित्त गरजवंताना मास्क व प्लास्टिक घोंगसी चे वाटप करण्यात आले. या प्रसंगी नगर सेवक महेश भूयारकर, राजेश भेंडे, विशाल देशमुख, संजय गांधी, निराधार योजनेचे अध्यक्ष जितू गिरडकर, महाराष्ट्र प्रदेशचे सचिव केतन रेवतकर, उमरेड विधानसभा कार्याध्यक्ष रितेश राऊत, शहर अध्यक्ष गुणवंत मांढरे, मनिष सिंगने, राकेश नौकरकर, अमित लाडेकर, रोशन झाडे, चेतन पडोळे, निखिल काटवले, महेश लांजेवार, बालाजी मुंगळे, जगदीश मोहीनकर यांचेसह युवक काँग्रेस चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Copyright ©