यवतमाळ सामाजिक

घाटंजी बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये शेतकऱ्यांना हेलपाटे

——————————————–
चार महिन्यांपासून शाखा व्यवस्थापकच नाही.
——————————————–
घाटंजी (तालुका प्रतिनिधी) पावसाळा ऋतु सुरू झाला असल्याने शेतकरी बांधवांची पेरणी साठी जिकडे तिकडे लगभग सुरू झाली आहे. अश्यातच बहुतांश शेतऱ्यांना बी बियाणे कर्ज काढूनच खरेदी करून पेरणी करावी लागते. मात्र घाटंजी येथिल बँक ऑफ महाराष्ट्र चे व्यवस्थापक ऐन पेरणी च्या तोंडावर बॅंकेतून गायप होत असल्याने ईतर कर्मचाऱ्यांकडून उडवाउडविची उत्तर मिळून या शाखेत शेतकरयांना केवळ हेलपाटे मारावे लागत आहे.
घाटंजी तालुक्यातील बँक ऑफ महाराष्ट्र या शाखेत बहुतांश गावांचा समावेश आहे. आणि शेतकरी वर्ग या मितीला बँकेच्या कर्जावर अवलंबून राहून त्याआधारे आपली पेरणी करतो. मात्र सतत या ना त्या कारणाने चर्चेत राहणाऱ्या या बँकेतील शाखा व्यवस्थापक ऐन पेरणीच्या तोंडावर रजेवर जातात त्यामुळे मुद्दाम करून ईतर कर्मचारी जबाबदारी झटकून शेतकऱ्यांना वेटिस पकडण्याचा प्रकार सऱ्हास या बँकेत चालला असताना सुध्दा या भागातील लोकप्रतिनिधी मूंग गिळून गप्प बसले आहे. यात शेतकरी बांधवांचे अतोनात नुकसान होत असून त्यांची पेरणी पडण्याची वेळ आली आहे. या होणाऱ्या गैरसोयी बद्दल दाद मिळविण्यासाठी मोवाडा येथिल शेतकरी किरण वसंता राठोड यांनी या बँके विरोधात तहसिलदार, माजी केंद्रीय राज्य मंत्री हंसराज अहिर, आमदार डॉ. संदीप धुर्वे, सहनिबंधक यांना लेखी निवेदन पाठवून या बँकेच्या कारोभारात तातडीने सुधारणा आणावी विना विलंब शेतकरयांना कर्ज द्यावे. अन्यथा आमचे शेत पडीत पडेल. यात आमच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ ओढाऊ शकते त्यामुळे आम्हाला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. असे आपल्या निवेदनात नमूद केले आहे. याच प्रमाणे कुर्ली येथिल ग्रामीण बँकेत हाच प्रकार चालू आहे. तेथीलही शाखा व्यवस्थापक रजेवर असल्याने कुर्ली परिसरातील शेतकरी वर्गातून रोष व्यक्त केला आहे. यावर जिल्हाधिकारी साहेबांनी लक्ष घालून शेतकरयांना तातडीने कर्ज वाटप करण्यात यावे अशी मागणी तालुक्यातील मोवाडा येथिल शेतकरी किरण राठोड यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

Copyright ©