Breaking News यवतमाळ सामाजिक

तीन तासाच्या पावसात तीन महिन्यापूर्वी बनवलेला तीन लाखांचा पुल गेला वाहून

ठेकेदारांकडून पांदण रस्त्याचे तीन तेरा

यवतमाळ तालुक्यातील नाका पारडी येथील झोला परिसरातील पांदण रस्त्यावर शेतात जाण्यासाठी महत्वाचा असलेला पुल अनेक वेळा पाठपुरावा करून पुल बनविण्यात आला होता या पुलाचे काम इतके निकृष्ट करण्यात आले की पहिल्याच पावसात पुल वाहून गेला या पुलावरील तीन लाख खर्च केले तीन महिन्यातच वाहून गेले विशेष म्हणजे या मार्गांनी शेतात जाणार्यांचा रस्ताच बंद झाल्याने येथील शेतकऱ्यानं समोर मोठे संकट उभे राहिले आहे आता पेरणी चे दिवस असून शेतात जावकसे शेतीचे कामे कराव कसे हा यक्ष प्रश्न समोर निर्माण झाला आहे प्रथमच कोरोणा संकट निवळल्या निवळत नाही त्यात असल्या प्रकारचे संकट येऊन उभे राहत असल्याने शेतकरी हतबल झाले आहे जिल्हा परिषद अंतर्गत करण्यात आलेल्या बांधकामात गैर प्रकाराचा पुरावा या पुलावरून दिसून आला भ्रष्टाचार करणाऱ्या ठेकेदार व अधिकाऱ्याविरुद्ध कठोर पावले उचलली होती ती फक्त कांगदो पत्रीच होते का? अशा गैर प्रकारावर पांघरून घालण्या साठी केवळ कारवाईचा कांगावा तर केला नाहि ना असा सवाल ग्रामस्थांना कडून करण्यात येत आहे.

Copyright ©