यवतमाळ सामाजिक

जैन संघटना कोव्हीडग्रस्त अनाथ विद्यार्थ्यांचे होणार पालक!

 

यवतमाळ:- भारतीय जैन संघटना द्वारा महाराष्ट्र मध्ये कोरोनामुळे अनाथ झालेल्या जवळपास ७०० विद्यार्थ्याचे पालक होण्याची तयारी दर्शविली असून त्यांचे शिक्षण,राहणे, जेवनाचे, मेडिकल औषध,डॉक्टर इत्यादी गरजा पूर्ण करणार आहे

या मध्ये वर्ग ५ ते १२ वी च्या मुला मुलींनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन जैन संघटनेने केले आहे. कोविडमुळे विद्यार्थ्याचे सर्वात मोठे नुकसान झाले आहे तसेच हे विद्यार्थी प्रचंड तणावाखाली जीवन जगत आहेत.त्यांना दैनंदीन शिक्षणासोबच मानसिक तणावामधून बाहेर काढून मुख्य प्रवाहात आणने,त्यांचा आत्मविश्वास वाढविणे व ते साकारण्यासाठी सक्षम करणे हे मोठे आव्हान आहे.
पुणे येथील जैन हॉस्टेल मध्ये वसतिगृह, खेळाचे मैदान,दवाखाना,मानसोपचार तज्ञ अशा सर्व सुविधा उपलब्ध आहे.
येथे यापूर्वी लातूर येथील १२०० भूकंग्रस्त विद्यार्थी,मेळघाट व ठाण्यातील ११००आदिवासी विद्यार्थी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे ७०० विद्यार्थी अशा एकूण ३००० विद्यार्थ्यांना मानसिक तनावामधून बाहेर काढून त्यांचे शैक्षणिक पुनर्वसन गेल्या ३० वर्षात भारतीय जैन संघटनेना करीत आहे. अश्या सर्व अनाथ झालेल्या यवतमाळ जिल्यातील विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारण्याबाबतचे पत्र जिल्हाधिकारी अमोल येडगे तसेच निवासी जिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांना देण्यात आले. या वेळी शिष्टमंडळातील प्रकल्प मार्गदर्शक महेन्द्र सुराणा ,संयोजक शेखर बंड, संयोजक विजय बुंदेला ,जिल्हाध्यक्ष महेन्द्र बोरा व सुशील कटारिया यांचा सहभाग आहे.

Copyright ©