Breaking News यवतमाळ सामाजिक

गेल्या 24 तासात 69 कोरोनामुक्त ; 14 पॉझेटिव्ह जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2222 बेड उपलब्ध

 

यवतमाळ, दि. 18 जून : गेल्या 24 तासात जिल्ह्यात 14 जण पॉझेटिव्ह तर 69 जण कोरोनामुक्त झाले आहे. जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार शुक्रवारी एकूण 1444 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 14 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 1430 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 164 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72620 तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 70670 झाली आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1786 मृत्युची नोंद आहे.

जिल्ह्यात आतापर्यत 6 लक्ष 70 हजार 821 चाचण्या झाल्या असून त्यापैकी 5 लक्ष 98 हजार 199 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 10.83 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 0.97 आहे तर मृत्युदर 2.46 आहे.

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2222 बेड उपलब्ध: जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 34 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 2279 आहे. यापैकी 57 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 2222 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 577 बेडपैकी 30 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 547 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 526 बेडपैकी 21 रुग्णांसाठी उपयोगात तर 505 बेड शिल्लक आणि 34 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 1176 बेडपैकी 6 उपयोगात तर 1170 बेड शिल्लक आहेत.

__________________________________

मतदार यादीतील छायाचित्र 25 जून पूर्वी अद्यावत करा

– जिल्हाधिकारी अमोल येडगे

छायाचित्र नसलेली 38 हजार 351 नावे वगळणार

यवतमाळ, दि. 18 जून : मतदार यादीत ज्या मतदारांची छायाचित्रे समाविष्ट नसतील ( नो फोटो व्होटर्स ) अशा मतदारांची यादी www.yavatmal.nic.in या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. अशा मतदारांची मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्याकडुन पडताळणीही होत आहे. त्यामुळे यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांनी 25 जुनपूर्वी आपली छायाचित्रे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी किंवा संबंधित तहसील कार्यालय किंवा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयात जमा करावीत.

मतदार यादीत अद्यापही छायाचित्र नसलेल्या विधानसभा मतदार संघ वणी येथील 2697, राळेगाव 1, यवतमाळ 33504, दिग्रस 262, आर्णी 178, पुसद 1555 व उमरखेड मतदार संघातील 154 असे एकूण 38 हजार 351 मतदारांनी छायाचित्र जमा केलेले नाही. मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांकडुन छायाचित्रे मिळवून ते यादीत अद्यावत करण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरभेटीही देतात. मात्र, अनेकदा मतदार यादीत नमुद पत्यावर राहत नसल्याचे आढळुन आले आहे. याबाबत पंचनामे करून अशा मतदारांची नावे भारत निवडणुक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनानुसार वगळण्यात येणार आहेत.

ज्या मतदारांची नावे वगळण्यात येतील ते नव्याने नमुना 6 द्वारे अर्ज करून पुन्हा आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करू शकतात, असे उपजिल्हा निवडणुक अधिकारी डॉ. स्नेहल कनिचे यांनी कळविले आहे

___________________________________

मार्जिन मनी योजनेंतर्गत प्रस्ताव आमंत्रीत

यवतमाळ, दि. 18 जून : अन्वये केंन्द्र शासनाच्या स्टॅंन्ड अप इंडिया योजनेत अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकाकरिता दिनांक 08 मार्च 2019 च्या शासन निर्णयान्वये मार्जिन मनी योजना सुरु करण्यात आलेली आहे. या योजनेच्या मार्गदर्शक सुचना 9 डिसेंबर 2020 च्या शासन निर्णयन्वये निश्चित करण्यात आल्या असून सदर शासन निर्णय www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर निरीक्षणासाठी उपलब्ध आहे. तरी उपरोक्त योजनेकरीता इच्छूक लाभार्थ्यांनी आपला प्रस्ताव सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यवतमाळ यांच्याकडे शासन निर्णयातील नमूद करण्यात आलेल्या सर्व अटी व शर्तीची पूर्तता करुन प्रस्ताव सादर करावा असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यवतमाळ यांनी केले आहे.

____________________________________

पारधी समाजासाठीच्या विविध योजनांकरिता प्रस्ताव आमंत्रीत

यवतमाळ, दि. 18 : पारधी समाजाच्या विकासासाठी विविध योजना राबविणे सन 2020-21 अंतर्गत पारधी जमातीच्या लाभार्थ्यांना आटाचक्कीचा पुरवठा करणे, कुकुट पालनाकरीता अर्थसहाय्य करणे, मोटार ड्रायव्हींगचे प्रशिक्षण देणे, शेळी पालन , दुधाळ जनावरे, काटेरी तारकुंपन, तुषार सिंचन व ठिंबक सिंचन याकरीता अर्थसहाय्य करणे तसेच महिला व पुरुष बचतगटास जलशुध्दीकरण प्रकल्प देणे या योजनेकरीता लाभार्थ्यांनी अर्ज करावेत. या योजनेकरीता पुसद, दिग्रस, दारव्हा, आर्णी, नेर, महागाव व उमरखेड या 7 तालुक्यातील पारधी लाभार्थ्यांनी अर्ज करावेत.

सदर योजनेचे अर्ज प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पुसद तसेच आदिवासी मुलांचे शासकीय वसतीगृह दारव्हा, दिग्रस व आर्णी या ठिकाणी उपलब्ध आहेत. पारधी लाभार्थ्यांना मोटार ड्रायव्हींगचे प्रशिक्षण देणे, पारधी जमातीच्या गरजांचे सर्व्हेक्षण करणे, बालसंस्कार केंद्र संस्थेमार्फत राबविणे याकरीता पात्रताधारक संस्थानी आवश्यक कागदपत्रासह प्रस्ताव प्रकल्प कार्यालय, पुसद येथे सादर करावेत, असे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी यांनी केले आहे.

___________________________________

पेरणीसाठी स्वतःकडील सोयाबीन बियाणे वापरा

कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन

यवतमाळ, दि. 18 : महाराष्ट्र राज्यामध्ये सोयाबीन पिकाखालील क्षेत्रामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. खरीप २०२१ मध्ये सोयाबीन पिकाखाली जवळपास ४३.५० लाख हेक्टर क्षेत्र अपेक्षित आहे. या वाढीव क्षेत्रासाठी गुणवत्तापूर्ण बियाण्याची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते. सोयाबीन हे स्वपरागसिंचित पीक आहे. या पिकाचे सर्वच वाण सरळ वाण आहेत. त्यामुळे दरवर्षी बियाणे बदलाची आवश्यकता नाही. एकदा प्रमाणित बियाणे वापरल्यानंतर त्याच्या उत्पादनातून येणारे बियाणे पुढील २ वर्षापर्यंत वापरता येते. मागील दोन वर्षात शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या प्रमाणित बियाण्यापासुन उत्पादीत झालेले स्वतःकडील सोयाबीन बियाणे शेतकरी पेरणीसाठी वापरु शकतात. यामुळे शेतकऱ्यांना दरवर्षी बाजारातून महागडे बियाणे विकत घ्यावे लागणार नाही व बियाणे खरेदी वरील खर्चात बचत होऊ शकते.

सोयाबीन पीक हे स्वपरागसिंचित पीक असल्यामुळे केंद्र शासनाने निश्चित केलेल्या सोयाबीन विद्यमान बियाणे बदल दर ३३ टक्के इतका आहे . म्हणजे जिल्ह्यातील एकूण सोयाबीन पिकाच्या क्षेत्राला ७५ किलो प्रति हेक्टर याप्रमाणे लागणाऱ्या एकूण बियाणे गरजेच्या केवळ ३३ टक्के बियाणे हे बाहेरून बाजारातून शेतकऱ्यांनी खरेदी करणे अपेक्षित असून उर्वरित ६७ टक्के बियाणे शेतकऱ्यांनी स्वतः तयार करून स्वतःकडील वापरणे अपेक्षित आहे. परंतु जिल्ह्यातील सरासरी बियाणे बदल दर हा 70 % इतका आहे, म्हणजेच जिल्ह्यातील शेतकरी ग्राम बीजोत्पादनाद्वारे स्वतःचे बियाणे तयार करून वापरण्याऐवजी प्रमाणापेक्षा जास्त सोयाबीन बियाणे बाजारातून विकत घेतात. त्यामुळे बियाणे पुरवठा यंत्रणेवर अतिरिक्त ताण येतो व शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात सुद्धा वाढ होते व तसेच बियाणेच्या उपलब्धतेसंबंधी, गुणवत्तेसंबंधी व उगवणूकीसंबंधी तक्रारीमध्ये वाढ होऊन त्याचे निराकरण करण्यासाठी शासकीय यंत्रणेवर अतिरिक्त ताण येतो.

उपरोक्त वस्तूस्थिती लक्षात घेऊन शेतकरी स्तरावर जागृती निर्माण करण्यासाठी कृषि विभागामार्फत मागील वर्षीपासुन व्यापक प्रमाणात घरचे सोयाबीन बियाणे वापरणे बाबतची मोहिम हाती घेण्यात आली आहे. याचप्रमाणे इथून पुढे खरीप हंगामात तसेच शक्य असेल तिथे उन्हाळी हंगामात शेतकऱ्यांनी स्थानिक पातळीवर सोयाबीन ग्रामबीजोत्पादनाचा कार्यक्रम घेण्याची आवश्यकता आहे. ग्रामबीजोत्पादन कार्यक्रमाद्वारे शेतकरी स्तरावर उत्पादीत सोयाबीन बियाण्याचा शेतकरी स्तरावर पेरणीसाठी राखून ठेवलेला साठा पुढील खरीप हंगामामधील पेरणीपर्यंत राखून ठेवण्यासाठी व पेरणीसाठी राखून ठेवलेले सोयाबीन बियाणे बाजारात विकण्यापासून शेतकऱ्यांना परावृत्त करणेसाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करणे आवश्यक आहे.

यामुळे त्या शेतकऱ्याची व आजूबाजूच्या शेतकऱ्यांची सोयाबीन पेरणीसाठी आवश्यक असणाऱ्या बियाणेची गरज भागू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांना बाजारातून महागडे बियाणे विकत घ्यावे लागणार नाही व त्यांच्या लागवड खर्चात बचत होऊ शकेल. खरीप २०२२ मध्ये सोयाबीन बियाणे बदल दर कमी करण्यासाठी खरीप २०२१ या हंगामात पेरणी पासूनच शेतकऱ्यांनी प्रत्येक हंगामात स्वतःकडील बियाणे तयार करून पेरणीसाठी वापर करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.

 

____________________________________

योग दिनानिमित्त डाक विभागातर्फे 21 जुन च्या टपालावर विशेष शिक्के

यवतमाळ, दि. 18 : भारतीय डाक विभाग जागतिक योग दिनाचे औचित्य साधून 21 जून 2021 रोजी 810 मुख्य पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून विशेष अधिकृत शिक्का ( स्पेशल कॅन्शलेशन स्टॅम्प ) जारी करणार आहे. यवतमाळ मुख्य डाकघर येथे 21 जून 2021 रोजी कार्यालयात बुकींग केलेल्या सर्व टपालावर विशेष अधिकृत शिक्का मारण्यात येईल. विशेष अधिकृत शिक्का वर हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत आंतराष्ट्रीय योग दिवस अशा प्रकारचा ग्राफीकल डिजाइन सह शास्त्रीय रचनेचा ठसा किवा चिन्ह असेल.

पोस्टाचे तिकीटे यांचा पुर्नरवापर होऊ नये म्हणून तिकीटावर शिक्का मारला जातो. अशाप्रकारे विशेष अधिकृत शिक्का हे संग्रहणीय आणि अभ्यासाचा विषय म्हणून महत्वाचा असतो. सध्याच्या काळात मुद्रांक संकलनाची आवड कमी झाली आहे आणि ही आवड / छंद लोकांनी जोपासावा म्हणून भारतीय डाक विभागात फिलाटेली म्हणून एक योजना चालवली जाते.

देशातील कोणत्याही मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये २०० रुपये जमा करुन फिलाटेली डिपॉजिट अकाऊंट सहजपणे उघडता येते आणि त्याद्वारे फर्स्ट डे कवर, फिलाटेली स्टॅम्प व कॅन्सलेशन कॅचेट ईत्यादी मिळू शकतात. यावर्षी कोविड – १९ हा साथीचा रोग सर्व देशभर असल्यामुळे परिस्थितीचा विचार करून योगा बरोबर रहा, घरी रहा. असे प्रोत्साहन देण्यात आले आहे. सध्या देश सावधपणे लॉकडॉऊनमधून बाहेर पडत असतांना ८० विविध विशेष अधिकृत शिक्के ज्यावर त्या त्या पोस्ट ऑफिसच्या डिजाइनची रचना असेल अशी विशेष अधिकृत शिक्का गोळा करण्याची संधी आहे. त्यामुळे डाकघर अधीक्षक, यवतमाळ यांनी सर्वांना या संधीचा उपयोग घ्यावा, असे आवहन अधीक्षक डाकघर यांनी कळविले आहे.

___________________________________

अवसायनातील संस्थांबाबत आक्षेप आमंत्रीत

यवतमाळ, दि. 18 : यवतमाळ तालुक्यातील पुढील संस्था अवसायानात काढण्यात आल्या असून सदर संस्थांची नोंदणी रद्द करण्यापूर्वी संस्थेचे धनको व ऋणको तसेच सभासदाकडून काही आक्षेप हरकती असल्यास 15 दिवसाचे आत संस्थेचे संबंधीत सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, यवतमाळ किंवा संस्थेचे अवसायक यांचेकडे सादर कराव्यात.

अभिनव गृहनिर्माण सहकारी सस्था मर्या. यवतमाळ, प्रकाश गृहनिर्माण सहकारी संस्था मर्यो. यवतमाळ, जिल्हा पत्रकार गृहनिर्माण सहकारी सस्था मर्या. यवतमाळ, कोहिनुर गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या. यवतमाळ, गुलाबनगर गृहनिर्माण सहकारी सस्था मर्या. लोहारा, वृंदावन गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या. यवतमाळ, राधेय मा.व गृहनिर्माण सह संस्था म.लोणी घाटाणा र.न .३५७, स्व.राजीव गांधी तांत्रीक स्वयंरोजगार सेवा सह. संस्था मर्या. यवतमाळ र.नं .१७२०, नवनिर्माण स्वयंरोजगार सेवा सह. संस्था मर्या. यवतमाळ १७३६, उत्साही स्वयंरोजगार सेवा सह. संस्था मर्या. सायखेडा ता. यवतमाळ र.नं .१७२५, विश्वभारती तांत्रिक स्वयंरोजगार सेवा सहसंस्था. यवतमाळ र.नं .१३६६, जयमल्हार स्वयंरोजगार सेवा सह. संस्था मर्या.नेताजीनगर, यवतमाळ र.नं १७१२, संत तुकडोजी महाराज स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था मर्या. वडगाव यवतमाळ, सूयोग स्वयंरोजगार सहकारी संस्था मर्या. यवतमाळ, शिव स्वयंरोजगार सेवा सह. संस्था मर्या. यवतमाळ, स्वामी समर्थ स्वयंरोजगार सेवा सह. संस्था मर्या. लोहारा, सियाराम गृह निर्माण सहकारी संस्था मर्या. यवतमाळ, गुरूगोविंदसिंग गृह निर्माण सहकारी संस्था मर्या. यवतमाळ, सुरभी गृह निर्माण सहकारी संस्था मर्या. यवतमाळ, हर्षवर्धन गृह निर्माण सहकारी संस्था मर्या. यवतमाळ, समर्थ स्वयंरोजगार सहकारी संस्था मर्या. उमरसरा, संघर्ष सुशिक्षीत बेरोजगार सहकारी संस्था मर्या. यवतमाळ, गुरुदत्त गृह निर्माण सहकारी संस्था मर्या. यवतमाळ, कमलापार्क गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या. यवतमाळ, रुद्राक्ष गृह निर्माण सहकारी संस्था मर्या. यवतमाळ, संत गाडगेबाबा गृहतारण सहकारी संस्था मर्या. यवतमाळ

संत गाडगेबाबा गृहतारण सहकारी संस्था मर्या. यवतमाळ, महालक्ष्मी पार्क गृह निर्माण सहकारी संस्था मर्या. यवतमाळ, गार्डन गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या. यवतमाळ, अष्टविनायक गृहतारण सहकारी संस्था मर्या. यवतमाळ, इंद्रप्रस्थ गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या. यवतमाळ, उत्कर्ष गृहतारण सहकारी संस्था मर्या. यवतमाळ, कमला नेहरु गृह निर्माण सहकारी संस्था मर्या. यवतमाळ प्रशिक मागास. स्वयंरोजगार सेवा सह. सं.म.अंबिकानगर यवतमाळ, साईशक्ती अभियांत्रिकी व तांत्रिकी स्वयंरोजगार सेवा सह. संस्था मर्या. यवतमाळ र.नं .१७२८, नवदुर्गा स्वयंरोजगार सेवा सह. संस्था मर्या. यवतमाळ १७१९, गजानन स्वयंरोजगार सहकारी संस्था मर्या. गहूली हेटी पो.तवसा विजया स्वयंरोजगार सहकारी संस्था मर्या. यवतमाळ, सुदामबाबा पाणी वापर सहकारी संस्था मर्या. लखमापूर, महाराष्ट्र सुशिक्षीत बेरोजगार सहकारी संस्था मर्या. यवतमाळ, १३६१ क्रिष्णा गृहदेखभाल सहकारी संस्था, मर्या. चांदोरे नगर यवतमाळ १५४०, ओमशिवम गृहनिमार्ण सहकारी संस्था म. पिंपळगाव सावित्रीबाई फुले मागासवर्गीय गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या. यवतमाळ ६२५, सत्यम गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या. यवतमाळ ३१३, चतुर्थ श्रेणी कर्मचारी गृह निर्माण सह. संस्था मर्या. यवतमाळ १२०, कन्यका गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या. यवतमाळ, नारीगे नगर गृह निर्माण सहकारी संस्था मर्या. यवतमाळ १५९, रॉबीन गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या. यवतमाळ १२६५, चेतना गृह निर्माण सहकारी संस्था मर्या. यवतमाळ १२६८, तंत्रशिक्षण गृहनिर्माण सहकारी संस्था. मर्या . यवतमाळ १२७४, मार्केटिंग फेडरेशन कर्मचारी गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या. यवतमाळ, लक्ष्मीकृपा गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या. यवतमाळ १२८३, संत गाडगेबाबा गृहतारण सहकारी संस्था मर्या. यवतमाळ ३४५, क्रांतिवीर बिरसा अभियांत्रिक व तांत्रिक स्वयंरोजगार सेवा सह. संस्था मर्या, नेताजी नगर यवतमाळ १७८६, राधाकृष्ण नगरी देखभाल सहकारी संस्था मर्या. यवतमाळ र.नं .१५२९,

श्री लक्ष्मीनारायण गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या. यवतमाळ, मागगारुडी गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या. यवतमाळ, श्री. गणेश विहार गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या. यवतमाळ, रमाबाई आंबेडकर गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या. यवतमाळ, वनश्री गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या. यवतमाळ, प्रबोधन शासकीय कर्मचारी गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या वडगाव, लक्ष्मीकृष्ण गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या. यवतमाळ, भगी समाज मागासवर्गीय गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या. यवतमाळ, गणेशकृपा गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या. यवतमाळ, शिवशंकर गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या. वाघापुर, गुलमोहर गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या. यवतमाळ, मातोश्री रमाबाई आंबेडकर मागासवर्गीय गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या. यवतमाळ, राजेंद्र प्रसाद गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या. यवतमाळ, वैभव गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या. यवतमाळ, शिवशक्ती गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या. यवतमाळ, नियोजित नामाकृती मागासवर्गीय गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या. यवतमाळ, जयश्री गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या. यवतमाळ, कर्मवीर भाऊराव पाटील गृहतारण सहकारी संस्था मर्या. यवतमाळ, तुळजाभवानी गृहदेखभाल सहकारी संस्था मर्या. यवतमाळ, कान्होबा मागासवर्गीय गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या. पिंपळगाव ग्रीन फिल्ड, गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या. यवतमाळ, आकृती गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या. यवतमाळ, आजनेय गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या. लोहारा, सावित्री ज्योतिराव गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या. पिंपळगाव शिव गृहतारण सहकारी संस्था मर्या यवतमाळ

शांती निकेतन गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या. यवतमाळ, तथागत मागासवर्गीय गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या. यवतमाळ, एकलव्य आदिवासी कर्मचारी गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या. यवतमाळ, चरणामृत गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या. वडगाव, न्यु उत्कर्ष गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या. लोहारा, श्री.चिंतामणी गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या वाघापुर यवतमाळ, स्नेहा गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या. लोहारा, कौसाई गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या. मोहा, विश्वकमणी गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या. लोहारा, नमो चिंतामणी गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या. मोहा, गजवक्र गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या. यवतमाळ, शिवछत्रपती गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या. यवतमाळ, गुरुकृपा गृहदेखभाल सहकारी संस्था वडगाव रोड मर्या. यवतमाळ, विनाई गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या. मोहा, शासकीय सेवक गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या. यवतमाळ, समता गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या. यवतमाळ, मयुर गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या. यवतमाळ, महसूल कर्मचारी गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या. यवतमाळ, राजस्व गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या. यवतमाळ, श्रीगणेश गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या. यवतमाळ, राजहंस गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या. यवतमाळ, संत गजानन महाराज गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या. यवतमाळ, गणपती गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या. यवतमाळ, न्यायालयीन कर्मचारी गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या. यवतमाळ, मयुरेश्वर गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या. यवतमाळ, चैतन्य गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या. यवतमाळ

उक्त कालावधीत कोणतेही आक्षेप, हरकती प्राप्त न झाल्यास कोणाला काहीही म्हणण्याचे नाही असे गृहीत धरून संस्थांनी नोंदणी रद्द करण्याबाबतची कारवाई करण्यात येईल, असे सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक यांनी कळविले आहे.

Copyright ©