यवतमाळ सामाजिक

हिवरी परिसरात अतिवृष्टीमुळे बियाण्यासह शेती गेल्या खरडून

——————————————–
ढगफुटी सदृश परिस्थिती
——————————————–
शेतकऱ्यावर दुबार तिबार पेरणीचे संकट
———————————————
यवतमाळ-: या हंगामात वेळेवर मान्सून दाखल झाल्याने शेतकरी बांधवात आनंदाचे वातावरण पसरले होते. यातच मोठ्या लगबगीने पेरणीही आटोपली. मात्र दररोज दमदार पाऊसाने हजेरी लावली असतानाच गुरूवारला हिवरी परिसरात अतिवृष्टी होवुन शेतातील पेरणी केलेल्या बियाण्यासह शेत खरडून वाहून गेले आहे यात या ढगफुटी सदृश परिस्थिमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होवून दुबार तीबार पेरणीची वेळ आली आहे.
कोरोनाच्या संकटाने मेटाकुटीस आलेल्या शेतकरी बांधवांनी प्रथमतःच कसे बसे बियाण्याची व्यवस्था केली होती. मात्र निसर्गाच्या अवकृपेने त्याच्या आशेत विरजण पडले आहे. हा एवढा भयानक असा पाऊस होता की, गत पंधरा वर्षातही एवढा पाऊस झाला नव्हता अशी प्रतिक्रिया पूर्वज जाणकार शेतकऱ्यांनी यावेळी व्यक्त केली. या पावसात बबनराव चेके, आनंदराव चेके यांचे शेत पुर्णतः खरडून वाहून गेल्याने यांच्या शेतातील पेरलेले काहीच बियाणे राहिले नाही. बियाणे उगविण्या आधीच एवढे मोठे संकट या शेतकऱ्यांवर कोसळल्याने शासन स्तरावरून तातडीने या शेतकऱ्याच्या शेतात जावून मोका पाहणी करून सानुग्रह मदत करून या शेतकऱ्यांना आधार द्यावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

Copyright ©