गावाशेजाराच्या नाल्यावर खेळत असतांना अंघोळ करायला उतरलेल्या बहिण भावाचा पाण्यात बूडुन मृत्यू झाला हि घटना हिंगोली पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या आमगाव देवळी गावातील नाल्यात सोमवारी सकाळी उघडकीस आली आरुषी नामदेव राऊत वय ११ व अभिषेक नामदेव राऊत वय ७ वर्ष दोघेही रा.आमगाव देवळी अशी मृतक भावंडांची नावे आहे.
नामदेव राऊत व त्यांची पत्नी शेतमजुरी चे काम करून आपला उदरनिर्वाह करतात नेहमीप्रमाणे मजुर गेले होते आई-वडील गेल्यानंतर आरुषी व अभिषेक गावशेजाराच्या नाल्यावर खेळत असताना त्यांना आंघोळ करण्याच्या मोह झाला दोघेही पाण्यात उतरून पावसामुळे नाला तुडुंब भरला होता त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने खोल पाण्यात बुडुन मृत्यू झाला आई-वडील सायंकाळी मजुरीवरून घरी आल्यानंतर त्यांना मुले कुठेच दिसले नाही सर्वत्र शोधा शोध सुरु झाला रात्री बऱ्याच उशिरापर्यंत शोध घेऊनही मुलांचा कुठेच थांगपत्ता लागला नाही दरम्यान सोमवारी सकाळी गावकऱ्यांच्या मदतीने शोध सुरू केले असतात गावशेजाराच्या नाल्याचा काठावर मुलाच्या चपला व कपडे आढळून आले यानंतर हिंगणा पोलिसांना सूचना देण्यात आली घटनेची माहिती मिळताच ठाणेदार सरिन दुर्गे आपल्या पथका सह घटनास्थळी दाखल झाले गावकर्यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आले.
Add Comment