यवतमाळ :- महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक संघटनेच्या वतीने मुख्यकार्यकारी अधिकारी यांना निवेदन देवून जिल्हापरिषदेचे समोर आंदोलन करण्यात आले आशा व गटप्रवर्तक महीला आजपासून संपावर जात असुन कोरोणा कामाचा दररोज पाचशे रुपये स्वतंत्र प्रोस्ताहन मोबदला शासनाने द्यावा तसेच कीमान वेतन दरमहा आशांना १८००० रूपये मानधन व गटप्रवर्तकांना दरमहा २१००० रूपये द्यावे या मुख्य मागण्या करिता आजपासुन यवतमाळ सह राज्यातील ७० हजार आशा व गटप्रवर्तक महीला लाक्षणिक संपात सहभागी होत असून , कोवीड १९ विषयक सर्व कामावर आशा व गटप्रवर्तक महीलांचा बहिष्कार आहे
आशा व गटप्रवर्तक संघटना कर्मचारी कृती समिती व राज्याचे आरोग्य मंत्री व शासना सोबत झालेल्या बैठकीत कुठलाही तोडगा निघाला नसल्याने ना इलाजास्तव आंदोलन करणे भाग पडले आहे , आज घडीला देशातील खासदारांना भत्ते पकडून दरमहा तीन लाखाचे वर मानधन आहे आणी आमदार यांना भत्ते धरूण दोन लाखांचा जवळपास मानधन आहे मंत्री महोदयांचे सोडून च द्या मरेपर्यंत पेन्शन परंतु देशात असंघटीत कामगारांना कीमान वेतन दिल्या जात नाही ही केवढी दुर्दैवी गोष्ट आहे , देशाला स्वातंत्र्य मीळुन ७४ वर्ष लोटून गेलीत फरक येवढाच गोरे गेले आणी काळे आले असेच चीत्र आपल्या भारतात पहायला मीळत आहे.. ही लोकशाही आहे की ठोकशाही आहे हा आम्हाला प्रश्न पडला आहे ? सनदशीर मार्गाने आंदोलन करूण कामगारांना दोन वेळेच्या जेवण्या येवढेही मानधन शासन देत नाहीत तर कष्टकरी वर्गाने काय करायला पाहिजे शासन तुटपुंज्या मानधनात वेठ बीगारी सारखे राबवून घेत आहे , आशा व गटप्रवर्ताकांनी कोवीडच्या दोन्हीही लाटीत जिवाची पर्वा न करिता जिव झोकून फक्त १००० रूपये मानधनात काम केले आहे असे असतांनी केंद्र व राज शासनाने झोपेचे सोंग घेतले आहे..शासन त्यांचे आर्थिक शोषण करीत आहे, तेव्हा केंद्र व राज्य शासनाने आमच्या मागण्याची दख्खल घेऊन मागण्या ताबडतोब निकाली काढव्यात अन्यथा सर्वच कामावर बहिष्कार टाकून आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा यावेळी कॉ.दिवाकर नागपुरे , राज्य उपाध्यक्ष , आयटक , महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक संघटना यांनी दिला आहे या वेळी निवेदन देताना , मंगला लाकडे , सुलोचना घोडे ,ज्योती भुजाडे ,प्रेमीला शिवनकर , वर्षा जांभुळकर ,मणीषा ताजने , रंजना वानखेडे , मंगला सरदार , कविता बोरकर ,सुरेखा सरग , मणीषा बनसोड , सुनंदा कांबळे , कल्पना मरस्कोले , दिपा झोंबाळे , महानंदा भगत ,मीना भीमटे , अर्चना राठोड , रंजना मेश्राम ,अर्चना तोंडरे ,ज्योती शेटे , वणीता जाधव , ज्योती कांबळे , रंजना राऊत , सूजाता नगराळे , सरला पावडे ,शारदा भुते ,उज्जवला कारंजेकर ,नितू जतकर ,प्रतीभा ठाकरे ,मणीषा मडावी , यासह शेकडो महीला उपस्थित होत्या
Add Comment