यवतमाळ राजकीय

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस विविध क्रीडा व सामाजिक उपक्रमांनी साजरा

युवासेना जिल्हा युवा अधिकारी विशाल गणात्रा यांचा पुढाकार

युवासेना प्रमुख तसेच राज्याचे पर्यावरण तथा राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस माजी मंत्री संजय राठोड,जिल्हा प्रमुख पराग पिंगळे व जिल्हा प्रमुख राजेंद्र गायकवाड यांचे मार्गदर्शनात विविध क्रीडा व सामाजिक उपक्रमांचे माध्यमातून साजरा करण्यात आला.युवासेना जिल्हा प्रमुख विशाल गणात्रा यांनी हे कार्यक्रम आयोजित केले.सर्वप्रथम यवतमाळ नागपूर बायपास येथे सकाळी सात वाजता भव्य सायक्लोथॉनचे आयोजन करण्यात आले.ही स्पर्धा विस वर्षाखालील व व वीस वर्षावरील खुला गट अशा दोन गटात घेण्यात आली.ह्या स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने हौशी व युवा सायकल पटून्नी भाग घेतला.स्पर्धा पूर्ण करणाऱ्या सर्व सायकल पटून्ना सहभाग स्मृतिचिन्ह देण्यात आले.ह्या स्पर्धेमध्ये वीस वर्षाखालील वयोगटात विवेक पवार प्रथम ,अनुप चालपेवार द्वितीय चिन्मय जयवंत तृतीय पुरस्काराचे मानकरी ठरले.तर विस वर्षावरील खुल्या गटात संग्राम धोटे प्रथम,लियाकत हुसेन द्वितीय तर सुरेश भूसंगे तृतीय पुरस्काराचे मानकरी ठरले.या स्पर्धेकरिता चिन्मय जयवंत आणि यश गावंडे यांचे विशेष सहकार्य लाभले.त्यानंतर सकाळी 11 वाजता स्थानिक पोस्टल मैदान येथे सेव्हन ए साईड फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.ह्या स्पर्धेचे उदघाटन शिवसेना जिल्हा प्रमुख पराग पिंगळे व शिवसेना विधी व न्याय विभाग जिल्हा संघटक अभिजित बायस्कर यांचे प्रमुख उपस्थितीत झाले.स्पर्धेत जिल्ह्यातील एकंदर दहा चमुंन्नी सहभाग नोंदवला.ह्या स्पर्धेत रॉयल किंग फुटबॉल क्लब हा संघ प्रथम पुरस्काराचा मानकरी ठरला तर शिवशक्ती स्पोर्ट्स क्लब हा संघ द्वितीय पुरस्काराचा मानकरी ठरला.ह्या स्पर्धेच्या आयोजनाला शिवशक्ती स्पोर्ट्स अकॅडमीचे विशेष सहकार्य लाभले.स्पर्धेमध्ये पंच म्हणून अजय चमेडीया, अजिंक्य गायकवाड, गौरव जाधव, वंश कुथे यांनी काम पाहिले तर स्पर्धा यशस्वितेकरिता प्रितम शहाडे, अभिजित पवार, अक्षय शहाडे, शाम तायवाडे, सागर लुटे,प्रणय रागीनवार यांनी विशेष सहकार्य केले.

तदनंतर स्टेटबँक चौक ते पोस्टऑफिस ह्या रस्त्याचे सुशोभीकरण उपक्रमा अंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले.युवासेना जिल्हा प्रमुख विशाल गणात्रा व कॉटन सिटी क्रिकेट क्लब यवतमाळ यांचे पुढाकारात हा रस्ता पाम वृक्ष लागवड करून सुशोभित केला जात आहे.
कोरोना परिस्थिती पाहू जाता स्थानिक महाजन वाडी येथे लसीकरण शिबिराचे सुद्धा आयोजन केले गेले.ह्या लसीकरण शिबिरात पंचेचाळीस वरील नागरिकांचे लसीकरण केले गेले.

ह्या कार्यक्रमानंतर शासकीय वैद्यकीय रुग्णालयात रुग्णांचे नातेवाईकांना मोफत भोजन वाटप करण्यात आले.ह्या प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख पराग पिंगळे,शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र गायकवाड,युवासेना जिल्हा युवा अधिकारी विशाल गणात्रा,उपजिल्हा प्रमुख गजानन डोमाळे, ऍड अभिजित बायस्कर,पत्रकार तुषार देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते.

सायंकाळी स्थानिक नेहरू स्टेडियम येथे बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.ह्या स्पर्धेच्या आयोजनात लीलाधर निनगुरकर ह्यांनी पुढाकार घेतला.स्पर्धेचे विजेतेपद कृरिअस क्लबला तर उपविजेते पद अनुज वारीयर्स क्लबला प्राप्त झाले.
सायंकाळी स्थानीक विश्रामगृह येथे आयोजित सर्व क्रीडा स्पर्धांचे बक्षीस वितरण शिवसेना जिल्हा प्रमुख पराग पिंगळे यांचे हस्ते करण्यात आले.सायक्लोथॉन,फुटबॉल,बास्केटबॉल या स्पर्धांचे विजयी व उपविजयी चमुंना विजयी व उपविजयी पदाची बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले.युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या ह्या सर्व उपक्रमांचे आयोजनात युवासेना जिल्हा युवा अधिकारी विशाल गणात्रा,शुभंकर भट,विनीत हातगावकर,ऋग्वेद राय यांनी विशेष पुढाकार घेतला.

Copyright ©