यवतमाळ सामाजिक

४१ वेळा रक्तदान करणाऱ्या शशिकांत ऊर्फ बाळू धुमाळ यांचा सन्मान.

 

(शासकीय रक्तपेढी द्वारे जिल्ह्यातील 25 पेक्षा अधिक वेळा रक्तदान करणाऱ्यांचा सन्मान)

आज जागतिक रक्तदान दिन. या निमित्त वसंतराव नाईक शासकीय रक्तपेढी यवतमाळ द्वारे जिल्ह्यातील 25 पेक्षा अधिक वेळा रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांचा सन्मान करण्यात आला यात राळेगाव तालुक्यातून शशिकांत ऊर्फ बाळू धुमाळ यांना सन्मानित करण्यात आले. विशेष म्हणजे त्यांनी आजपर्यंत तब्बल 41 वेळा रक्तदान केले.
कोरोना संक्रमण काळातही शशिकांत उर्फ बाळू धुमाळ यांनी अनेक रुग्णांना मदत केली हे विशेष
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष अधिष्ठाता डॉ.मिलिंद कांबळे मते रक्तदानाविषयी रक्तदान हे जीवनदान आहे. सर्वांनी रक्तदानाचे महत्व समजायला हवे. आपण दिलेल्या रक्तदानामुळे कुणाचा तरी जीव वाचू शकतो. कधी तरी आपल्या कुटुंबातील व्यक्तीलाही याचा फायदा होऊ शकतो. विशेष म्हणजे तरूण वर्गाने सामाजिक बांधिलकी जोपासत नियमित रक्तदान करणे गरजेचे आहे अश्या शब्दात उपस्थित रक्तदाते व कर्मचारी यांना विचारांतून प्रेरित केले.शशिकांत उर्फ बाळू धुमाळ यांच्या सारख्या पासून प्रेरणा घेण्याची गरज असल्याचे भाष्य केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेंद्र भोयर यांनी रक्तदानाचे महत्व अतिशय मार्मिक शब्दात व्यक्त केले तसेच या कार्यक्रमात 25 पेक्षा जास्त वेळा रक्तदान करणारे दानशूर रक्तदाते यांचा जाहीर सन्मान करण्यात आला यावेळी अनेक युवकांनी ऐच्छिक रक्तदान केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तथा प्रास्ताविक वैद्यकीय समाजसेवा अधीक्षक अमर इमले केले व कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन समाजसेवक गणेश कानडे यांनी केले या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक व विभागप्रमुख डॉ.स्नेहलता हिंगवे तर कार्यक्रमाचे मार्गदर्शक व रक्तपेढी प्रमुख प्रा.डॉ. किरण भारती सहाय्यक प्राध्यापक डॉ. विशाल नरोटे व कार्यालयातील कर्मचारी रक्तदाते उपस्थितीत होते..

Copyright ©