यवतमाळ सामाजिक

हिवरी हे गाव एचडी बिटी म्हणून प्रसिध्दीस

———————————————-
तंत्रज्ञानाची मान्यता व बियाणे उपलब्धतेची मागणी
———————————————
यवतमाळ-: जिल्ह्यातील शेतकरी संघटनेच्या गोळीबार झाल्यामुळे आंदोलक गाव म्हणून आपली वेगळी प्रतिमा उमटविणारे तंत्रज्ञानासाठी गाव म्हणून परिचित असलेले हिवरी गाव एचडी बिटी म्हणूनही प्रसिध्दीस आले आहे.
या गावातील सर्व शेतकरी आंदोलन आणि सविनय कायदेभंग करण्याच्यादृष्टीने आणि तंत्रज्ञानाची लढाई करण्याच्या दृष्टीकोनातून आपापल्या शेतात एचडी बिटी कापसाची वाण लावून याची जनजागृती करून सरकार पर्यंत तंत्रज्ञानाची मागणी दरवर्षी करीत असते गत सहा वर्षात येथील शेतकरी एचटी बिटी लागवड करीत आज येथिल शेतकरी आपल्या शेतात या वाणाची कापूस लागवड करून आंदोलनाची भूमिका घेत आहे. त्याचाच एक भाग म्हणून दिनांक १४ जून सोमवारला रुपेश ठाकरे आणि विजय निवल यांच्या शेतात जिल्हा अध्यक्ष राजेंद्र झोटींग व उच्च अधिकारी समिती मधील सदस्य जयवंतराव बापट यांच्या उपस्थितीमध्ये आंदोलनाचा भाग मानून या वाणाची लागवड केली.
यवतमाळ जिल्हा कपासासाठी मुख्य जिल्हा असल्याने येथिल शेतकऱ्यांचे शेतीअनुभव शासनापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न व तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकर्यांच्या जीवनात त्यांच्या राहणीमानात किती बदल पडला याबद्दल अभ्यास करून ताबडतोब या तंत्रज्ञानाची मान्यता व बियाणे उपलब्ध करून द्यावे यासंदर्भातील मागणी येथिल शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र झोटिंग यांच्या पुढाकारात शेतकरी बांधवांनी शासनाकडे केली आहे.

Copyright ©