यवतमाळ राजकीय

मनसेच्या दणक्याने खरेदी विक्री साठीची कोरोना चाचणीची अट अखेर रद्द

 

 

निर्णयाचे सर्वत्र स्वागत

यवतमाळ जिल्हा खरेदी-विक्री विभागात कोरोनाच्या पार्श्वभुमीवर काही निर्बंध लावण्यात आले होते . त्यात प्रामुख्याने येणाऱ्‍या प्रत्येक व्यक्तीला कोविड चाचणी सक्तीची केली होती अनेक नागरीकांना यामुळे आर्थिक तसेच मानसिक भुर्दंड सहन करावा लागत होता . या विषयाची गंभीर दखल घेत या विषयाची तक्रार मनसेचे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार , अनिल हमदापुरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली होती.त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोना चाचणी ची अट रद्द करण्याचे आदेश आज काढले. अनेक लोकांना खरेदीची तारिख दिल्यानंतर त्यांनी भरलेला महसूल हा व्यर्थ जात होता त्यांना नाहक त्रास होत होता. खरेदी-विक्री करत असतांना लागणाऱ्‍या साक्षीदारांची मोठी अडचण होत असून त्या अभावी खरेदी रद्द करण्याशिवाय कोणताही पर्याय त्या व्यक्तीसमोर राहत नव्हता तसेच सद्या जिल्ह्यात पेरणीचे काम सुरु असून अनेक शेतकऱ्‍यांना पिककर्जासाठी गहाणखत करणे आवश्यक असते. अशा परिस्थितीत ग्रामीण भागातून येणारा शेतकरी हा या नियमांमुळे तातकळत बसतो. तसेच विवाह जोडप्यांना पण खूप अडचणी येत होत्या कारण कोणीच साक्षीदार कोरोना चाचणी मुळे स्वाक्षरी करण्यास तयार होत नव्हता .जिल्ह्यात कोरोनामुळे नागरिक तसेच शेतकरी, व्यापारी हवालदिल झाले असून अशा परिस्थितीत संबंधीत विभागाने काढलेल्या आदेशामुळे लोकांचे खूप हाल सुरू होते त्यामुळे या निर्णयामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असून मनसेच्या भूमिकेचे स्वागत करत मनसेचे देवा शिवरामवार, अनिल हमदापुरे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केल्या जात आहे.या निर्णयामुळे व्यापारी, शेतकरी, विवाह जोडपे, आणि सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

Copyright ©