Breaking News यवतमाळ सामाजिक

आशा वर्कर वर भ्याड हल्ला करणाऱ्या उपसरपंचा वर कठोर कारवाई करण्याची मागणी

——————————————–
आशा वर्कर संघटनेचे वरिष्ठ अधिकारी यांना निवेदन
——————————————–
यवतमाळ-: जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यात येत असलेल्या सायतखर्डा येथिल आशा वर्कर कोरोना योद्धा गंगा मारोती कुमरे व कालिंदा राजेश डहाके या कर्तव्यावर असताना येथिल उपसरपंच मधुसूदन संभाजी मोहूर्ल्ले यांनी भ्याड हल्ला चढवीत गंभिर जखमी केल्यामुळे आयटक, महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा वर्कर व गट प्रवर्तक संघटनेच्या जिल्हा शाखेद्वारे निषेध व्यक्त करीत जिल्हा पोलिस अधीक्षक यांचे सह जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी यांना निवेदन सादर करून या गुंड प्रवृत्तीच्या उपसरपंचाची उच्चस्तरीय चौकशी करून शासकीय कामात अडथळा या गुन्ह्यासह कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
दिनांक ८ जून ला गंगा कूमरे व कालिंदा डहाके या आशा वर्कर आरोग्य विषयी कामकाजासाठी रामपूर प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत येणाऱ्या सायतखर्डा उपकेंद्रात जात होत्या अश्यातच दुपार दरम्यान उपसरपंच मधुकर मोहूर्ल्ले यांनी त्यांना रस्त्यात अडवून त्यांचेवर शस्त्राचा वापर करून जिवघेणा हल्ला चढविला यात त्या गंभिर जखमी झाल्या. या घडलेल्या गंभीर प्रकाराने जिल्ह्यातील आशा वर्कर व गटप्रवर्तक यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे आरोग्य विभागात महत्वाचे कार्य बजावणाऱ्या तुटपुंज्या मानधनावर समाधान मानून घेणाऱ्या कर्मचाऱ्यावर झालेला जिवघेणा हल्ला अतंत्य अन्यायकारक आहे. त्यामुळे रामपूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी यांनी शासकिय कामात अडथळा केल्याचा पारवा पोलिसात फिर्याद नोंदवावी आणि कलम ३५३ हा गुन्हा दाखल करण्यास भाग पाडावे. या माणुसकीच्या धर्माला काळीमा फासणाऱ्या घटनेचा उच्चस्तरीय चौकशी करून यातील दोषी उपसरपंच मोहुर्ल्ले यांचेवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी याकरिता आशा वर्कर संघटनेने लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे. तसे न झाल्यास संपूर्ण जिल्ह्यातील कोरोना योद्धा आशा वर्कर व गटप्रवर्तक महिला कोरोना काळातील सर्व आरोग्य विभागाचे कामकाजावर बहिष्कार टाकण्याचाही इशारा यावेळी निवेदनातून देण्यात आला आहे. या निवेदनावर आयटक, महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते चे जिल्हा सचिव दिवाकर नागपुरे, दिव्या संजय झोपाडे, मनिषा ताजने, अल्का शिंदे, रंजना राऊत, सुरेखा बेलखेडे, रंजना वानखेडे, सविता बर्डे, ज्योती रोकडे, ललिता गाथे, संगीता ढेरे, दीपा झोबांडे, उषा क्षिरसागर, वैशाली ओंकार, मंगला धोंगडे, अर्चना भगत, प्रतिभा ढोणे, विद्या गोळे, मंगला सरदार, गौरी उजवने, मंगला राखुंडे, वैशाली लिखार, माला मसराम, आशा खडसे, महानंदा रामटेके यासह सुजाता नगराळे यांच्या निवेदनावर सह्या केलेल्या आहेत.

Copyright ©