Breaking News यवतमाळ सामाजिक

विज कोसळून शरद शेत शिवारात युवकाचा जागीच मृत्यू

——————————————-
तर एक गंभीर जखमी
——————————————-
यवतमाळ-: पावसाळ्याला सुरूवात होताच मंगळवारच्या दुपारी अचानक आभाळ भरून आले. अश्यातच वादळ वाऱ्यासह पाऊसास सुरुवात झाली. यामध्ये विज कडाडत अचानक शरद शिवारातील नाबिना मोहंमद यास्मिन यांचे शेत सर्वे नंबर १२ मध्ये ट्रॅक्टरद्वारे शेतीची मशागत करीत असताना ट्रॅक्टर चालक सुखदेव पारनु कोळझरे वय २५ वर्ष यांच्या अंगावर कोसळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर ट्रॅक्टर मालक गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
पेरणीची वेळ तोंडावर असल्याने शरद शेत शिवारातील शेतात सुखदेव रोजंदारीने ट्रॅक्टर द्वारे शेतीची मशागत करण्यासाठी गेला होता. सोबतच ट्रॅक्टर मालक कमलाकर श्रीराम मेश्राम हेही होते. अश्यातच अचानक वातावरणाचा बदलाव होवून दिनाक ८ जून रोजी दुपारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊसास सुरुवात झाली. यातच काही कळायच्या आतच विजाचा कडकडाट होवुन सुखदेवच्या अंगावर विज कोसळली यात त्याचा जागीच मृत्यू झाला. तर ट्रॅक्टर मालक कमलाकर गंभीर जखमी झाला. सुसाट सुरू असलेल्या पावसात त्याला तातडीने उपचारार्थ हलविण्यात आले आहे. मृतक सुखदेव शरद येथिल रहिवासी असून तो आई समवेत रोज मजुरी करून आपले व आईचे गुजराण करीत होता. मात्र त्यांचेवर काळाने घाला घातला त्यामुळे त्यांची आई एकाकी पडली आहे. मुलाच्या भरोष्यावर जीवनाचा गुजराण करणाऱ्या माऊलीचा आधारवड हिरावल्याने तिच्या पुढे मोठे संकट येवून पडले आहे. सर्वांशी मिळून मिसळून राहणाऱ्या सुखदेव वर अचानक घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे शरद परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून मोलमजुरी करून जिवन जगणाऱ्या कमावता सुखदेव गेल्याने आई कसे जिवन जगणार हा मन हेलावून टाकणारा विषय पुढे आल्याने त्याच्या आईला शासन स्तरावरून तातडीची मदत देवून तिला आधार द्यावा अशी मागणी परीसातून होताना दिसत आहे. सुरुवातीच्याच पावसाने कळंब तालुक्यात मंगळवारच्या दुपारपासूनच दमदार हजेरी लावल्याने कुठे कमी तर कुठे जास्त असा पावसाचा व वादळ वाऱ्ह्याचा तडाखा शेतकऱ्यांना सहन करावा लागला.

Copyright ©