यवतमाळ सामाजिक

“वर्षपूर्ती अभियानात” कोरोना योद्ध्यांचा सत्कार

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात सात वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सेवा दिवस अभियान राबविण्यात आले .यासाठी आमदार मदन भाऊ येरावार व जि. प .सदस्य रेणू संजय शिंदे यांनी बोरीसिंह व सायखेडा (खुर्द) येथे कोरोना योद्ध्याचा सत्कार शाल व श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन केला .तसेच आशा वर्कर अंगणवाडी सेविका यांचा सत्कार साड्या देऊन केला व सर्व गावकऱ्यांसाठी 800 प्रिव्हेंटिव्ह किड्स चे वाटप करण्यात आले. यावेळी आमदार मदन येरावार यांनी केंद्र सरकारने राबविलेल्या सर्व कार्याची माहिती दिली व कोरोना योद्ध्यांचे दिलेल्या सेवेबद्दल आभार व्यक्त केले. तसेच जि प सदस्य रेणू शिंदे यांनी कोरोनाच्या काळात जनसेवा हीच ईश्वर सेवा असा संदेश दिला. या निमित्ताने सायखेडा येथे कोरोना लसीकरणाचा कार्यक्रम घेण्यात आला. अकोला बाजार पी एस सी चे डॉक्टर खालीद बेग व त्यांचे सर्व सहकाऱ्यांचे कोरणा योध्देम्हणून सन्मान करण्यात. यासाठी भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते तसेच सौ शकुंतला उमाटे आणि अजय धुरट ,विशाल बनसोड, गजानन इंगोले ,अनिल जगताप, गोपाल जोगदंड, अनंता टाले अनिल जोगदंड ,तलाठी खोडे ताई हबीब पठाण पवन मिश्रा संदीप धनगर वैभव जाचक गणेश मडावी व सर्व बोरी सिंह व सायखेडा येथील ग्रामस्थांनी हे अभियान राबविले.

Copyright ©