Breaking News यवतमाळ सामाजिक

जिल्ह्यात 24 तासात बरे होणारे दुप्पट जिल्हयात 300 कोरोनामुक्त, 123 पॉझेटिव्ह, 3 मृत्यु

 

यवतमाळ, दि. 30 मे :
गत 24 तासात जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा बरे होणारे रुग्ण दुपटीपेक्षा जास्त आहे. जिल्ह्यात 123 जण पॉझेटिव्ह तर 300 जण कोरोनामुक्त झाले असून तीन जणांचा मृत्यु झाला. तीनही मृत्यु खाजगी रुग्णालयातील आहे.

जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार रविवारी एकूण 4354 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 123 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 4231 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1649 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 694 तर गृह विलगीकरणात 955 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 71813 झाली आहे. 24 तासात 300 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 68404 आहे. तर जिल्ह्यात एकूण 1760 मृत्युची नोंद आहे. जिल्हयात आतापर्यत 6 लक्ष 19 हजार 253 चाचण्या झाल्या असून त्यापैकी 5 लक्ष 44 हजार 29 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 11.60 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 2.82 आहे तर मृत्युदर 2.45 आहे. आज खाजगी रुग्णालयात मृत्यू झालेल्यांमध्ये पांढरकवडा तालुक्यातील 53 वर्षीय पुरूष , वणी तालुक्यातील 65 व 60 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

पॉझेटिव्ह आलेल्या 123 जणांमध्ये 90 पुरुष आणि 33 महिला आहेत. यात आर्णी येथील 3, बाभुळगाव येथील 28, दारव्हा येथील 18, दिग्रस येथील 20, घाटंजी 2, कळंब 2, महागाव येथील 1, मारेगाव येथील 1, नेर येथील 2, पांढरकवडा 2, पुसद येथील 16, राळेगाव 4, उमरखेड 1, वणी येथील 4, यवतमाळ 17 तर झरीजामणी येथील 2 रुग्ण आहे.

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1878 बेड उपलब्ध:
जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 34 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 2278 आहे. यापैकी 401 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 1878 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 577 बेडपैकी 112 बेड रुग्णांसाठी उपयोगात, 465 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 526 बेडपैकी 110 रुग्णांसाठी उपयोगात, 416 बेड शिल्लक आणि 34 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 1176 बेडपैकी 179 उपयोगात तर 997 बेड शिल्लक आहेत.

Copyright ©