यवतमाळ सामाजिक

शिष्यवृत्तीचे अर्ज 31 मे पर्यंत सादर करण्याचे आवाहन

 

यवतमाळ, दि. 30 : समाजकल्याण कार्यालयामार्फत देण्यात येणारी अनु.जाती, इमाव, विजाभज, विमाप्र मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, फ्रिशीप संबंधीत सर्व योजनांचे कामकाज हे माहिती व तंत्रज्ञान संचालनालयाने तयार करण्यात आलेल्या (स्टेट डीबीटी ॲन्ड सर्विस पोर्टल) https://mahadbt.gov.in या संकेत स्थळावर लाभार्थ्यांच्या आधार क्रमांकांची बँक खात्याशी संलग्न करून सन 2020-21 चे अर्ज दिनांक 31 मे 2021 पूर्वी भरण्यात यावेत व तसेच परिपूर्ण भरलेले अर्ज दिनांक 31 मे पूर्वी सादर करण्यात यावेत.

विद्यार्थी सदर लाभापासून वंचित राहिल्यास सर्वस्वी जबाबदारी महाविद्यालयाची राहील. तसेच पात्र विद्यार्थ्यांकडून शुल्क घेता येणार नाही याची नोंद घ्यावी. संबंधीत विद्यार्थ्यांनी सुध्दा अर्जाची नोंदणी करून अर्ज महाविद्यालयास सादर करावेत असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांनी केले आहे.

Copyright ©