यवतमाळ सामाजिक

दिव्यांगाना कोरोना प्रतिबंध लसीकरण केंद्रावर मोफत ने आण व प्रोटीनयुक्त खाद्य पदार्थ.

घाटंजी येथिल जिवन विकास संस्थेचा उपक्रम

घाटंजी(तालुका प्रतिनिधी) दिव्यांग व्यक्तींचे कोरोना प्रतिबंध लसीकरण सुलभ व्हावे, त्यांचा लाभ त्यांना विना कष्ट घेता येईल या हेतूने जीवन विकास संस्थेचावतीने शहरात ‘पिकअप लसीकरण’ उपक्रम सुरू करण्यात आले आहे. घाटंजी शहरात सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाची संकल्पना संस्थेचे अध्यक्ष वैभव निखाडे यांनी उराशी बाळगून संस्थेचावतीने शहरातील दिव्यांग लसीकरण मोहिमेचा वेग वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. दिव्यांग बांधवांना लसीकरण केंद्रापर्यंत पोहोचुन लस घेणे जिकीरीचे ठरत होते. यावर उपाय म्हणून संस्थेचावतीने ‘पिकअप लसीकरण’ संकल्पना मांडण्यात आली. लसीकरण केंद्रावर दिव्यांग नागरिकांना मोफत गाडीने न्यायचं आणि आणायचं. तसंच, दिव्यांग व्यक्तींना कोरोना चाचणी, लसीकरण आणि कोरोना बाधित असल्यावर उपचारासाठी प्राधान्य देण्यात यावे. त्यांना कोणत्याही रांगेत उभे करू नये, असे निर्देश राज्य सरकारच्या समाजकल्याण विभागाकडून जारी करण्यात आले आहेत. त्याअनुषंगाने गाडीतून न उतरता त्यांना लसीचा डोस दिला जावा ह्या साठी संबंधित प्रभारी याना विनंती करून त्यानंतर त्यांना घरी सोडायच व प्रोटिनयुक्त खाद्य देऊन निरोप घ्यायचा. सर्व दिव्यांग नागरिकांना ने-आण करण्यासाठी कुटुंबातील सदस्य नाही किंवा गाडी नाहीये म्हणून अनेक दिव्यांग नागरिक लसीकरणा पासून वंचित होते. त्यांच्यासाठी संस्थेच्यावतीने गाडीची व्यवस्था करण्यात आली आहे. जेणेकरुन दिव्यांग नागरिकांना लसीकरण केंद्रावर जाण्यासाठी कसरत करावी लागणार नाही. घाटंजी शहरामध्ये ‘पिकअप लसीकरण’ सुविधेचा लाभ दिवसाला अनेक दिव्यांग व्यक्तीं घेऊ शकतील. आता केवळ दिव्यांग नागरिकांसाठीच ही सुविधा उपलब्ध असून लवकरच जेष्ठ नागरिकांनसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा मानस आहे. दिव्यांग नागरिकांना सहजतेने लसीकरण करता यावे, यासाठी “पिकअप लसीकरण” सुरू करण्यात आले आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास अशाच रीतीने शहरात विविध संघटना, पक्ष तसेच संस्थेचा वतीने अशीच सुविधा सुरू करावी माणूसकी धर्माचे पालन करून दिव्यांग नागरिक लसीकरणा पासून वंचित राहणार नाही, याची सर्व समाज सेवकांनी दक्षता घेतली पाहिजे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष वैभव निखाडे यांनी केले आहे. सदर उपक्रमाचा यशस्वीतेसाठी संस्थेचे तालुका संयोजक अमोल नडपेलवार, चालक मालक संघटनेचे मधुकर सोनूले, संविधान प्रचारक भाविक भगत, रुग्ण सेवक राकेश कत्तुरवार, राहुल घोडे, ,महेश लेदे, बंटी गवई,अक्षय अडकीने, दीपक देशमुख हे परिश्रम घेत आहे. सुविधेचा लाभ घेण्यासाठी राकेश कत्तुरवार मो.7887676432, राहुल घोडे मो.9325841672 यांचाकडे संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Copyright ©