यवतमाळ सामाजिक

दिव्यांगासाठी न. प. कडून शक्य सोयी सुविधा पुरविण्यास कटीबध्द. – नगराध्यक्षा नयनाताई ठाकूर

शिष्यवृत्ती सह पेन्शन बेरोजगार भत्ता वाटप.

घाटंजी(तालुका प्रतिनिधी) हलाकीच्या परिस्थितीत जिवन जगणाऱ्या दिव्यांग बांधव सक्षम व्हावा, त्याला सन्मानाने जिवन जगता यावे यासाठी शासन स्तरावरून स्थानिक स्वराज्यच्या आर्थिकसंकल्पाच्या राखीव निधीतून ५ टक्के निधी दिव्यांगासाठी वापरावा अशी तरतूद केली असल्याने दिनांक २९ मे रोजी घाटंजी नगर परिषदेमध्ये छोटेखाणी कार्यक्रम आयोजित करून पात्र दीव्यांग लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यास सुरुवात केली आहे. एवढेच नव्हे तर देिव्यांग बांधवासाठी नगर परिषद स्तरावरून ज्या ज्या सोयी सुविधा पुरविणे शक्य होवू शकते त्या त्या सोयी सुविधा पुरविण्यास कटिबध्द राहून प्रयत्नरत राहू असे घाटंजी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा नयनाताई शैलेश ठाकूर यांनी ग्वाही दिली.
घाटंजी शहरातील २०५ देिव्यांग लाभार्थ्यां पैकी १३ विद्यार्थ्यांना ३६०० रुपये प्रमाणे व ईतर दिव्यांगाणा पेन्शन बेरोजगार भत्ता म्हणून २००० हजार रुपये प्रमाणे ४,३०.८०० रुपये निधीचे वाटप नगराध्यक्षा नयनाताई ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली उपाध्यक्ष शैलेश ठाकूर, बांधकाम सभापती विक्की ठाकूर, सभापती सुमित्रा मोटघरे, नगरसेविका सुवर्णा गोमासे, सीता गिनगुले, ताई जाधव, माजी नगराध्यक्ष राम खांडरे, मुख्याधिकारी अमोल माळकर, प्रकल्प अधिकारी किशोर अंबुरे, यवतमाळ अर्बन बँकेचे व्यवस्थापक जोशी, सदानंद आडे, नखाते यांच्या उपस्थितीत बँक खात्यात जमा करण्यात आले.
यावेळी इतर आश्वासना सोबतच देिव्यांग बांधवांना भविष्यात कायमस्वरूपी सर्व सोयी सुविधायुक्त दिव्यांगभवन उभारून तालुका स्तरावर दिव्यांग बांधवांना हक्काचं छत्र उभाऱन्यासाठी आपण प्रयत्नरत असल्याचे आपल्या मनोगतातून नयनाताई ठाकूर यांनी स्पष्ट केले. यावेळी उपनगराध्यक्ष शैलेश ठाकूर व मुख्याधिकारी अमोल माळकर समायोचीत विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दत्ता उरकुडे, आशिष गिरी, गोडे, कचरू कुंटलवार, बाळा भोयर, किसन कस्तुरे यांनी परिश्रम घेतले.

Copyright ©