यवतमाळ सामाजिक

आमदार संजय भाऊ राठोड़ यांचे कडून दिव्यांगास मदत दिव्यांगाने केले आभार प्रकट

 

यवतमाळ:आज दिनांक 27/05/2021 रोजी दिग्रस तालुक्यातील कोडशि तांडा या गावातील दिव्यांग रामेश्वर राठोड़ यांना आमदार संजय राठोड यांचे कडून आरोग्याचे साहित्य देण्यात आले आपल्या आमदाराने आपल्याला मदत पाठवली हे पाहुन रामेश्वर ने खालील शब्दात आमदार साहेबांचे आभार प्रकट केले
आमदार संजयभाऊ राठोड साहेब यांचे उपकार आज कोणत्या शब्दात मांडू देवा ….खरचं देव माणूस पाहीले आज मी
आज माझ्या सारख्या अतिशय गरिब कुटूंबातील दिव्यांग कार्यकर्तास आरोग्य सेवेतील मौल्यवान साहित्य माझ्या घरी थेट रुग्णवाहिका द्वारे विनामूल्य उपलब्ध करून दिल्याबद्दल मी भारावून गेलो. आरोग्य साहित्यामध्ये पलंग, एअर बेड व इतर मला अवश्य असलेले विविध साहित्य देण्यात आले.यावेळेस शिव सेना तालुका प्रमुख उत्तम भाऊ ठवकर, मा.प.स.सभापती विनोदभाऊ जाधव, सुहासिक भाऊ खडसे यांच्या हस्ते देण्यात आले.मला आज खरंच खूपच मदत झाली. मी आमदार संजयभाऊ राठोड साहेब यांच्या बद्दल कोणते शब्द मांडू देवा शब्द अपुरे आहेत रे…..आज माझ्या जवळ माझी कळकळ ऐकून माझ्या दैवत बंजाराहृदयसम्राट संजय भाऊ राठोड साहेब यांना माझ्या सारख्या लाखो दिव्यांग व्यक्तीस मदत करण्याची शक्ती संत सेवालाल महाराज, संत मुंगसाजी महाराज, संत रामराव महाराज यांनी देवो हिच प्रार्थना

Copyright ©