Breaking News यवतमाळ सामाजिक

जिल्हयात 354 कोरोनामुक्त, 146 पॉझेटिव्ह, 4 मृत्यु जीएमसी, खाजगी व डीसीएचसीमध्ये एकूण 1832 बेड उपलब्ध

 

 

यवतमाळ, दि. 29 मे : गत 24 तासात जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा बरे होणारे रुग्ण जास्त आहे. जिल्ह्यात 146 जण पॉझेटिव्ह तर 354 जण कोरोनामुक्त झाले असून चार जणांचा मृत्यु झाला. यातील एक मृत्यु शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तर तीन मृत्यु खाजगी रुग्णालयातील आहे.

जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार शनिवारी एकूण 5358 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 146 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 5212 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1829 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 837 तर गृह विलगीकरणात 992 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 71690 झाली आहे. 24 तासात 354 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 68104 आहे. तर जिल्ह्यात एकूण 1757 मृत्युची नोंद आहे. जिल्हयात आतापर्यत 6 लक्ष 14 हजार 29 चाचण्या झाल्या असून त्यापैकी 5 लक्ष 39 हजार 797 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 11.68 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 2.72 आहे तर मृत्युदर 2.45 आहे.

 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यु झालेल्यांमध्ये यवतमाळ तालुक्यातील 77 वर्षीय पुरूष, तर खाजगी रुग्णालयात दिग्रस तालुक्यातील 52 वर्षीय पुरूष , घाटंजी तालुक्यातील 50 वर्षीय पुरूष तर पुसद तालुक्यातील 40 वषीय पुरूषाचा मृत्यू झाला आहे .

पॉझेटिव्ह आलेल्या 146 जणांमध्ये 95 पुरुष आणि 51 महिला आहेत. यात आर्णी येथील 3, बाभुळगाव येथील 8, दारव्हा येथील 7, दिग्रस येथील 3, घाटंजी 5, कळंब 1, महागाव येथील 3, मारेगाव येथील 9, नेर येथील 6, पांढरकवडा 10, पुसद येथील 11, राळेगाव 2, वणी येथील 27, यवतमाळ 42, झरीजामणी 3 आणि इतर शहरातील 5 रुग्ण आहे.

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1832 बेड उपलब्ध: जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 34 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 2278 आहे. यापैकी 446 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 1832 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 577 बेडपैकी 117 बेड रुग्णांसाठी उपयोगात, 460 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 526 बेडपैकी 119 रुग्णांसाठी उपयोगात, 407 बेड शिल्लक आणि 34 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 1175 बेडपैकी 210 उपयोगात तर 965 बेड शिल्लक आहेत.

Copyright ©