यवतमाळ सामाजिक

रामपूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर साठी आंदोलन

दोन दिवसात डॉक्टर न दिल्यास तीव्र आंदोलन

बोदडी येथिल युवकांचा इशारा

घाटंजी(तालुका प्रतिनिधी ) तालुक्यातील अतिशय दुर्गम भागात वसलेल्या रामपूर प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत अनेक गावांचा समावेश आहे. हा परिसर आदिवासी बहुल असून आरोग्याच्या दृष्टीने रामपूर प्राथमिक आरोग्य केंद्राशिवाय दुसरा पर्याय नाही. मात्र या ठिकाणी जबाबदार डॉक्टर नसल्याने व येथिल इतर कर्मचारी तालुका व जिल्हास्तरावर राहून कार्य बजावत असल्याने या परीसातील रुग्णाचे बेहाल होत आहे. ही सेवा सुरळीत व्हावी व या आरोग्य केंद्राला स्थिर डॉक्टर देण्यात यावा या मागणीसाठी २९ मे ला बोदडी येथिल युवकांनी रामपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात येवून गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केले. व दोन दिवसात डॉक्टर न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
अख्या जगात थैमान घातलेलेल्या कोरोना या महामारीने सध्या ग्रामीण भाग सुध्दा प्रभावित झाले आहे. सोबतच साथरोगांनी सुध्दा डोके वर काढले असल्याने ग्रामीण जनता भयभीत झाली आहे. आरोग्याची मोठी हमी देणाऱ्या सरकारी यंत्रणेत रामपूर प्राथमिक आरोग्य केंद्र अपवाद ठरत आहे. येथे कधीच डॉक्टर हजर राहत नाही. या ठिकाणचा जबाबदार डॉक्टरच राहत नसल्याने येथिल कर्मचाऱ्यावर कोणाचेही नियंत्रण नाही त्यामुळे ते कोणत्याही गावाला भेट न देता तालुका व जिल्हास्तरावर वास्तव्यास राहून ग्रामीण रुग्णांना पुर्णतः वाऱ्यावर सोडल्याचे आंदोलन कर्त्यांचे म्हणणे असून ही बाब या भागातील लोकप्रतिनिधी यांना माहीत असताना सुध्दा तेही डोळेझाक करताना आढळत असल्याचा दावा करण्यात आला. या आरोग्य केंद्रात येत असलेली गावे जंगल, डोंगर दऱ्यात आहे. सध्या कोरोना चे निर्बंध असल्याने तालुका स्तरावर रुग्णांना नेण्यास कोणतेही वाहन उपलब्ध नाही. त्यामुळे मोठ्या अपेक्षेने रामपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्ण घेवून जातात मात्र येथिल विखुरलेली आरोग्य यंत्रणा मारक ठरत आहे. आल्या पावली आरोग्य सेवे विना निराश होऊन परत जावे लागते. यासाठी बोदडी येथिल युवकांनी पुढाकार घेत या आरोग्य केंद्राला जबाबदार डॉक्टर द्या, येथिल आरोग्य यंत्रणा सुरळीत करून ग्रामीण रुग्णांस आरोग्य सेवा द्यावी यासाठी आंदोलनद्वारे मागणी केली असून अश्या बिकट परिस्थिती ची जाणीव ठेवून दोन दिवसात ही मागणी पूर्ण करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी उपस्थित आंदोलन कर्ते चेतन जाधव, ओमकार कामडी, राजु जाधव, अरुण कामडी, सुदर्शन आत्राम, शुभम आत्राम, पवन अळसपुर आकाश राठोड, रोशन कामडी, जिवन जाधव, चंद्रकांत कामडी, ओमकार उरकुदडे, मुकेश जाधव, पवन जाधव, विकास पवार यांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©