यवतमाळ सामाजिक

जालना येथील पोलिस व अधिकाऱ्याकडून अमानुष मारहाण केली त्यांना निलंबित करून गुन्हे दाखल करा गवळी समाज बांधव

 

दि 9 एप्रिल 2021 रोजी दिपक हॉस्पिटल , जुना जालना येथे , जालना शहरातील गवळी समाजाचे तरुण कार्यकर्ते , भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चा चे सरचिटणीस शिवराज नारीयलवाले* हे दिपक हॉस्पिटलमध्ये समाजाचेच एक तरुण अपघातात उपचारा दरम्यान निधन पावला म्हणून पाहायला गेले असताना तेथे डि वाय एस पी सुधीर खिरडकर , कदीम जुना जालना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन , पोलीस कर्मचारी सुमित सोळंके , सोमनाथ लामगे , महेंद्र भारसाकडे , होमगार्ड पठाण या सर्वांनी मिळून शिवराज नारीयलवाले यांना एखाद्या जनांवरपेक्षाही जास्त काठ्या तुटेपर्यंत जीवघेणी मारहाण केली* इतकेच नव्हे तर गवळी समाजाला उद्देशून असशील भाषेत जातीय वाचक शिवीगाळ केली हि बाब अत्यंत निंदनीय
खूपच दुःख दायक व मानवतेला व पोलीस खात्याला काळीमा फासणारे कृत्य या ठिकाणी पोलिसांनी केले त्यामुळे महाराष्ट्र राज्याची प्रतिमा सुध्दा मलिन झाली आहे
तरी कृपया ह्या पोलिसांच्या विरोधात लवकरात लवकर गुन्हा नोंद करून त्या सर्वांना बडतर्फ करावे , ही विनंती,
अन्यथा महाराष्ट्र गवळी समाज संघटना व भारतीय जनता पार्टी तर्फे संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करण्यात येईल अशा आशयाचे निवेदन

वटबोरी येथिल गवळी समाज बांधवानी व भारतीय जनता युवा मोर्चा च्या वतीने मा तहसिलदार कळंब यांना निवेदन देण्यात आले असता वटबोरी येथिल उप सरपंच रमेश झामरे प्र ना गुलाब बोपटे अरुन येवले भगवान चावरे श्रिकांत घाटोळ विजय चावरे गजानन कटारे भगवान बंधाटे रमेश येवले तसेच यवतमाळ जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चा सचिव जगलाल बैठवार हे हजर होते

Copyright ©