Breaking News यवतमाळ सामाजिक

24 तासात जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा बरे होणारे जास्त 118 पॉझेटिव्ह, 330 कोरोनामुक्त, 7 मृत्यु

 

जीएमसी, खाजगी व डीसीएचसीमध्ये एकूण 1809 बेड उपलब्ध

यवतमाळ, दि. 28 : गत 24 तासात जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा बरे होणारे रुग्ण जास्त आहे. जिल्ह्यात 118 जण पॉझेटिव्ह तर 330 जण कोरोना मुक्त झाले असून सात जणांचा मृत्यु झाला. यातील दोन मृत्यु शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात, तीन मृत्यू डीसीएचसी तर दोन मृत्यु खाजगी रुग्णालयातील आहे.

जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार शुक्रवारी एकूण 4959 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 118 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 4841जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 2041 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 867 तर गृह विलगीकरणात 1174 रुग्ण आहेत. तसेच आता पर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 71544 झाली आहे. 24 तासात 330 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 67750 आहे. तर जिल्ह्यात एकूण 1753 मृत्युची नोंद आहे. जिल्हयात आतापर्यत 6 लक्ष 8 हजार 142 चाचण्या झाल्या असून त्यापैकी 5 लक्ष 34 हजार 584 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 11.76 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 2.38 आहे तर मृत्युदर 2.45 आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यु झालेल्यांमध्ये यवतमाळ तालुक्यातील 50 वर्षीय पुरूष, उमरखेड तालुक्यातील 58 वर्षीय पुरूष तर डीसीएचसी पुसद येथे उमरखेड येथील 65 वर्यीय पुरूष, डीसीएचसी दिग्रस 55 वर्षीय पुरुष तर खाजगी रुग्णालयात घाटंजी तालुक्यातील 60 वर्षीय पुरूष, वणी तालुक्यातील 80 वर्षीय दोन पुरूषांचा मृत्यु झाला.

पॉझेटिव्ह आलेल्या 118 जणांमध्ये 74 पुरुष आणि 44 महिला आहेत. यात आर्णी येथील 2, बाभुळगाव येथील 1, दारव्हा येथील 13, दिग्रस येथील 17, महागाव येथील 4, मारेगाव येथील 28, नेर येथील 1, पांढरकवडा 6, पुसद येथील 8, राळेगाव 3, वणी येथील 13, यवतमाळ 8, झरीजामणी 12 आणि इतर शहरातील 2 रुग्णआहे.

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1809 बेड उपलब्ध: जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 34 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 2279 आहे. यापैकी 470 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 1809 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 577 बेडपैकी 116 बेड रुग्णांसाठी उपयोगात, 461 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 526 बेडपैकी 124 रुग्णांसाठी उपयोगात, 402 बेड शिल्लक आणि 34 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 1176 बेडपैकी 230 उपयोगात तर 946 बेड शिल्लक आहेत.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©