यवतमाळ सामाजिक

पोलिस वर्दीला काळीमा फ़ासणारे गुंडप्रवृत्तिच्या पोलिसांना त्वरित बड़तर्फ करावे – महाराष्ट्र गवळी समाज संगठन पुसद तालुका मांगणी

 

28 में  मागील काही दिवसांपूर्वी जालना शहरातील गवळी समाजाचे कार्यकर्ते श्री.शिवराज नारियलवाले, हे स्थानिक दीपक हॉस्पिटल मधे गवळी समाजाचे एक तरुण युवकाची अपघातात उपचार दरम्यान मृत्य झाल्याने त्याला पाहाले गेले असतांना त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या डीएसपी सुधीर ख़िरडकर, कदीम जुन्या जालना पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन, पोलिस कर्मचारी सुमित सोलंके, सोमनाथ लामगे,महेंद्र भारताकडे व होमगार्ड पठाण, या सर्वांनी मिळून श्री.शिवराज नारियलवाले यांच्या सोबत अमानुषिक रित्याने एका जनावरापेक्षाही जास्त काठ्या तुटेपर्यंत जीवघेणी मारहाण केली.ही घटना अत्यंत दुःखदायक असून ह्या घटनेचा वीडियो सोशलमीडियाच्या माध्यमातून वायरल झाल्यामुळे महाराष्ट्रातील सर्व गवळी समाजबांधव संतापलेले आहे. महाराष्ट्र राज्य हा पुरोगामी विचारांचा असून ही घटना मनावतेला व महाराष्ट्र पुलिस खात्याला काळीमा फांसणारी आहे, यामुळे महाराष्ट्र राज्याची प्रतिमा सुद्धा मलिन झालेली आहे.
तरी महाराष्ट्रातील सर्व गवळी समाजबाँधवाच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. ना.श्री.उद्धवजी ठाकरे, यांना श्री. एक प्रतिनिधिमंडळाच्या द्वारे एक निवेदन देण्यात येईल आणि विनंती करण्यात आली की या घटन्याचे सर्व पोलिस अधिकारी व कर्मचार्याच्या विरोधात त्वरित गुन्हे नोंद करून त्या सर्वाना बड़तर्फ करण्यात यावे, अन्यथा गवळी समाजाची अग्रगण्य संगठना महाराष्ट्र गवळी समाज संगठना(549) तर्फे सम्पूर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन करण्यात येईल.

Copyright ©